अकोला - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अकोल्यात शिवसेनेच्या वतीने मंगळवारी (दि. 24 ऑगस्ट) दुपारी निदर्शने करण्यात आली. त्यासोबतच त्यांचा कोंबडी घेऊन पुतळा तयार करून हा पुतळा दहन करण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडल्याने पोलीस आणि शिवसैनिक वाद झाला होता. जय हिंद चौक ते गांधी रोडपर्यंत हे आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी प्रतिक्रिया देताना आमदार नितीन देशमुख यांची जीभ घसरली आहे.
राज्यभरात नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिक चांगलेच तापले आहेत. अकोल्यातही संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणे यांचा विरोधात घोषणेबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड काढण्यात आली. तसेच पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. यामुळे शिवसैनिक व पोलीस यांच्यात वाद झाला होता.
हेही वाचा - राणेंना अटक : अदखलपात्र गुन्हे दखलपात्र केल्याचा चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप