छत्रपती संभाजीनगर - (औरंगाबाद) शहराच्या नामांतराला एक आठवडा झाल्यानंतर एमआयएमने अखेर आपले आंदोलन सुरू केले. जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. सर्व सामान्य लोकांना औरंगाबाद नाव पाहिजे, आमचा जन्म इथे झाला तेव्हा पासून आम्ही या नावासोबत जगलो. नावाला इतिहास आहे. तो पुसू नका, त्याकरिता आंदोलन करत असल्याचे एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यानी सांगितले.
सुप्रिया सुळे यांनी पदाचा राजीनामा देऊन यावे : आम्ही आंदोलन करताना राजकारण म्हणून करत नाही. नामांतराची घोषणा होण्याआधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विमान प्रवास करत असताना, संभाजीनगर टू मुंबई असे सोशल मीडियावर टाकले होते. नामांतर होण्याआधीच त्यांनी नावाला मान्यता दिली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला. त्यांना जर खरंच विरोध करायचा असेल तर त्यांनी, आमच्या सोबत आपल्या पदाचा राजीनामा देऊन येत विरोध करावा. त्यावेळेस त्यांचा खरच विरोध आहे का हे, आम्हाला कळेल अशी टीका खासदार जलील यांनी केली.
सर्वात जास्त प्रश्न लोकसभेत मांडले : औरंगाबादच्या इतिहासात कोणत्याच खासदारांनी इतके प्रश्न उपस्थित केले नाही, तितके प्रश्न मी आजवर उपस्थित केले. जर, कोणी त्याबाबत शंका व्यक्त करत असेल तर, त्याचे अज्ञान आहे, अशी टीका खासदार इम्तियाज झालेली यांनी केली. नामांतराबाबत लोकसभेत आजपर्यंत खासदार जलील यांनी कधीच आक्षेप नोंदवला नाही, किंवा प्रश्न उपस्थित केले नाही, अशी टीका त्यांच्यावर होत होती. मात्र, आपण वेळोवेळी याबाबत बोललो आहोत. 13 मार्चपासून अधिवेशन सुरू होत आहे, त्यात आपण नक्कीच नामांतर विरोधी भूमिका लोकसभेत मांडू असे खासदार जलील यांनी स्पष्ट केले.
साखळी उपोषण राहणार सुरू : शहराचे नाव औरंगाबादच राहावे याकरिता साखळी उपोषण सुरू करण्यात आल्याची घोषणा एमआयएम प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी केली. हे आंदोलन आता किती दिवस, आठवडे, महिने, वर्ष चालेल, हे आम्ही सांगू शकत नाही. आज पर्यंत सरकारने अनेक निर्णय सर्वसामान्य जनतेवर लादले आहेत, असेच निर्णय यापुढेही लागू नये म्हणून आमचा आमची आंदोलनाची भूमिका आहे. लोक रस्तावर उतरले तर, त्यांनाही आपले निर्णय बदलावे लागू शकतात. हे आम्ही दाखवून देऊ असा इशारा खासदार यांच्यात जलील यांनी दिला.
हेही वाचा - Vidya chavhan: सत्तेत राहून हिंदूंना मूर्ख बनवण्याचा काम भाजप करतंय.. विद्या चव्हाण