अकोला - राज्यात गुटखाबंदी आहे. तरिही काही प्रमाणात प्रतिबंधीत पदार्थांची विक्री होत असते. अकोला शहराती डाबकी रोडवर असणाऱ्या रेणुका नगरात एका घरातून, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल अडीच लाखांचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त केला आहे.
गुरूवारी दुपारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.
हेही वाचा...ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: भोगावती नदी वाळूप्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र, अहवालात गौडबंगाल
डाबकी रोडवरील रेणुकानगर येथील रहिवासी सचिन हरभाऊ राऊत यांच्या घरात प्रतिबंधित गुटका मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला असल्याची माहिती अकोला अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या घरात छापा टाकला. यावेळी त्याच्या घरात तब्बल अडीच लाखांचा प्रतिबंधीत गुटखासाठा असल्याचे आढळले. अधिकाऱ्यांनी हा सर्व साठा जप्त केला आहे.