ETV Bharat / state

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला नऊ मुलांना चावा, उपचार सुरू

पिसाळलेल्या कुत्र्याने नऊ मुलांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर  गावकऱ्यांनी त्या कुत्र्याला मारून टाकले असून पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाने खबरदारी म्हणून चावा घेतलेल्या मुलांना तातडीने पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे.

मुलांना जखमा झाल्याचे चित्र
author img

By

Published : Jun 18, 2019, 12:10 AM IST

अकोला - पिसाळलेल्या कुत्र्याने नऊ मुलांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी त्या कुत्र्याला मारून टाकले असून पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाने खबरदारी म्हणून चावा घेतलेल्या मुलांना तातडीने पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे.

पिंजर शहरात दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान दोन मुलांना हा कुत्रा चावला. तेव्हा हा विषय कोणाच्याही लक्षात आला नाही. मात्र, येथील अय्याज शे.रमजान याला कुत्र्याने चावा घेताच शे. रमजानभाई यांनी लगेच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना सांगितले. माहिती मिळताच दीपक सदाफळे यांनी 'डॉग कॅप्चर स्टिक' घेऊन बागवान पुऱ्याकडे धाव घेतली. एवढ्यातच बागवान पुऱ्यातील शे. सोपिहान याला सुद्धा या कुत्र्याने मांडीला जोरदार चावा घेतल्याने लगेच त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत एकुण नऊ मुलांना या कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सदाफळे यांनी गावात पिसळलेला पांढऱ्या रंगाचा एक कुत्रा फिरत असल्याची माहिती व्हॉट्सअपवर टाकुन नागरिकांना सावधान केले. तेव्हा हा कुत्रा पिसाळलेला असल्याची खात्री गावकऱ्यांना झाली. त्यानंतर मस्तानशा डीपी जवळ या कुत्र्याला नागरिकांनी ठार केले. फटाफट सर्व जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गेले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आगलावे यांनी सर्व जखमींना लस देऊन पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविले. जखमींपैकी शे.अय्याज शे. रमजान, प्रतुल विजय नवलकार, हुसेन शे. ईरफान, अब्राहम आरीफखान, अक्षरा राजेश वानखडे, शे.सोफीहान शे.ईरफान, शे.फरहान शे.करीम सर्व रा. पिंजर अशी त्यांची नावे आहेत.

Intro:अकोला - पिसाळलेल्या कुत्र्याने नऊ मुलांना चावा घेतल्याची घटना पिंजर येथे घडली. या कुत्र्याला मात्र गावकऱ्यांनी मारून टाकले असल्याने पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाने खबरदारी म्हणून त्या मुलांना तातडीने पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.Body:पिंजर शहरात दुपारी बारा वाजताच्या दरम्यान दोन मुलांना हा कुत्रा चावला. तेव्हा हा विषय कोणाच्याही लक्षात आला नाही. मात्र, येथील अय्याज शे.रमजान याला कुत्र्याने चावा घेताच शे. रमजानभाई यांनी लगेच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना सांगितले. तेव्हा लगेच दीपक सदाफळे यांनी 'डाॅग कॅप्चर स्टिक' घेऊन
बागवान पु-याकडे धाव घेतली. तर एवढ्यातच बागवान पु-यातील शे. सोपिहानला या कुत्र्याने मांडीला जोरदार चावा घेतल्याने लगेच त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. दुपारी बारा वाजतापासुन तर चार वाजेपर्यंत
एकुण नऊ मुलांना या कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती समोर आली. लगेच दीपक सदाफळे यांनी गावात पिसळलेला पांढ-या रंगाचा एक कुत्रा फिरत असल्याची माहिती व्हाटसपवर टाकुन नागरिकांना सावधान केले. तेव्हा हा कुत्रा पिसळलेला असल्याची खात्री झाली आणी लगेच मस्तानशा डीपी जवळ या कुत्र्याला नागरिकांनी ठार केले. फटाफट सर्व जखमिंना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आगलावे यांनी सर्व जखमिंना लस देऊन पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविले. जखमीपैकी शे.अय्याज शे. रमजान, प्रतुल विजय नवलकार, हुसेन शे. ईरफान, अब्राहम आरीफखान, अक्षरा राजेश वानखडे, शे.सोफीहान शे.ईरफान, शे.फरहान शे.करीम सर्व रा. पिंजर अशी त्यांची नावे आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.