अकोला - राज्य सरकारमधील सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या कृत्यामुळे सरकारची व महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने केली आहे. या मागणीला घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
उद्धव ठाकरे यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा -
राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप आहेत. त्यांनी केलेल्या प्रकाराबाबत माफी मागितली असली, तरी महिलांच्या संदर्भात असा खेळ करणे त्यांना शोभत नाही. ते राज्यातील जनतेचे प्रतिनिधित्त्व करणारे नेते आहेत. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाची गरिमा राखत राजीनामा द्यावा. जर ते राजीनामा देत नसतील, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेऊन राज्यातील महिला सुरक्षित असल्याचे दाखवून द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
काय आहे प्रकरण -
एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तीच्या म्हणण्या नुसार 'धनंजय मुंडे यांनी मला सांगितले की तुम्हाला गायक बनायचे असेल, तर मी चित्रपट जगतातील बड्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत तुझी भेट करुन देतो आणि तुला बॉलीवूडमध्ये लॉन्च करेन. याचा लोभ धरुन त्यांनी माझ्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुंडे यांनी सतत लैंगिक अत्याचार केले. जेव्हा-जेव्हा माझी बहीण कामानिमित्त बाहेर पडली, तेव्हा ते मला शारीरिक संबंध बनवण्यास भाग पाडत असत. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी या आरोपांचे खंडन केले होते.
हेही वाचा - मुलीच्या आगमनानंतर विराटने बदलला ट्विटर हँडलचा 'बायो'