ETV Bharat / state

अकोला जिल्हा परिषद-पंचायत समितीसाठी महिला आरक्षण सोडत जाहीर - जिल्हा परिषद-पंचायत समिती आरक्षण सोडत बातमी

अकोला जिल्हा परिषदेतील नामाप्र (ओबीसी) प्रवर्गासाठीच्या १४ तर अकोला, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा पंचायत समितींच्या २८ जागांवर गडांतर आले आहे. संबंधित जागा आता सर्वसाधारण प्रवर्गातून येणार असल्याने संबंधित जागांसाठी महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवारी (काल) सोडत काढण्यात आली आहे.

अकोला आरक्षण
अकोला आरक्षण
author img

By

Published : Mar 24, 2021, 5:28 PM IST

अकोला - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ओबीसी प्रवर्गातील जिल्हा परिषद सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या गटांसाठी (सर्कल) महिलांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया मंगळवारी(काल) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. यावेळी रिक्त झालेल्या १४ गटांपैकी (सर्कल) ७ गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यासोबत अकोला पंचायत समितीसाठी महिला आरक्षणाची प्रक्रिया तहसील कार्यालयात पार पडली. त्यामध्ये तीन गण महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. यापूर्वी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सर्व जागा आता सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणुकीद्वारे भरण्यात येणार आहे.

अकोला जिल्हा परिषद

अशी पार पडली प्रक्रिया

जिल्हा परिषदेच्या राजकीय आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या विषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा २७ टक्के आरक्षणानुसारच निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेतील नामाप्र (ओबीसी) प्रवर्गासाठीच्या १४ तर अकोला, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा पंचायत समितींच्या २८ जागांवर गडांतर आले आहे. संबंधित जागा आता सर्वसाधारण प्रवर्गातून येणार असल्याने संबंधित जागांसाठी महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवारी (काल) सोडत काढण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गटांसाठीचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात काढण्यात आले. यावेळी १४ पैकी सात गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेत सन २००३, २००८ व २०१३ मधील महिला आरक्षण लक्षात घेण्यात आले. त्यानुसार महिलांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. ही प्रक्रिया जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व निवडणूक विभागातील इतर कर्मचाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. अकोला पंचायत समितीमध्ये काढण्यात आलेल्या आरक्षणादरम्यान उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार व तहसीलदार विजय लोखंडे यांची उपस्थिती होती.

असे आहे जि.प.चे महिला आरक्षण
जिल्हा परिषद सर्वसाधारण महिला आरक्षण हे दानापूर, अडगाव, तळेगाव, अकोलखेड, कुटासा, लाखपुरी, बपोरी, घुसर, कुरणखेड, कानशिवणी, अंदुरा, देगाव, दगडपारवा, शिर्ला या गावांचा समावेश आहे.

हेही वाचा-फडणवीस सरकारमध्ये आरएसएसचा किती वाटा होता; नाना पटोलेंचा पलटवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.