ETV Bharat / state

अकोल्यात ३० नवीन रुग्णांची नोंद; दोघांचा मृत्यू

author img

By

Published : Jun 6, 2020, 7:55 PM IST

अकोल्यात आज 30 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे.

Akola corona update
अकोला कोरोना अपडेट्स

अकोला - जिल्ह्यात आज ३० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच २६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या १० रुग्णांमध्ये चार महिला व सहा पुरुष आहेत. त्यात सिंधी कॅम्प येथील दोघे तर उर्वरित गंगानगर जुनेशहर, गुलजार पुरा, सोनटक्के प्लॉट, जेतवननगर खदान, भारती प्लॉट, गणेशनगर, व्यंकटेशनगर, जयहिंद चौक येथील प्रत्येकी एक रहिवासी आहेत.

दरम्यान, दुपारी दोन जणांचा मृत्यू झाला. त्यातील एक ७० वर्षीय पुरुष असून तो गुलजार पुरा येथील रहिवासी आहे. हा रुग्ण 3 जून रोजी दाखल झाला होता. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच एका ४० वर्षीय महिलेचादेखील आज मृत्यू झाला. शरीफ नगर जुने शहर येथील रहिवासी आहे. ही महिला 27 मे रोजी दाखल झाली होती.

दरम्यान आज दुपारनंतर २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील आठ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित 18 जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आज प्राप्त अहवाल -

प्राप्त अहवाल- १०८

पॉझिटीव्ह- ३०

निगेटीव्ह- ७८

जिल्ह्यात सद्यस्थिती -

एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ७५६

मृत- ३६(३५+१)

डिस्चार्ज- ५३१

ॲक्टिव्ह रुग्ण -१८९

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.