ETV Bharat / state

Congress Agitation Akola : पंतप्रधानांच्या वक्तव्यविरोधात अकोल्यात काँग्रेसचे आंदोलन

author img

By

Published : Feb 21, 2022, 4:37 PM IST

पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. या कारणावरून काँग्रेसने आंदोलन पुकारले होते. भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अशोक मानकर यांचे नेतृत्वमध्ये भाजप आमदार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले.

Akola Congress Agitation over pm narendra modi speech
पंतप्रधानांच्या वक्तव्यविरोधात अकोल्यात काँग्रेसचे आंदोलन

अकोला - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधामध्ये काँग्रेसतर्फे आज भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर ( BJP Randheer Savarkar ) यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी काँग्रेसच्या आंदोलकांना तातडीने ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकारामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आंदोलक

काँग्रेसचा फूसका बार -

पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. या कारणावरून काँग्रेसने आंदोलन पुकारले होते. भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अशोक मानकर यांचे नेतृत्वमध्ये भाजप आमदार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. मात्र, आंदोलन दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा काँग्रेस कार्यकर्ते कमी होते. यामुळे काँग्रेसचा आंदोलनाचा हा फुसका बार ठरला, अशी चर्चा होती. अनुचित प्रकार होऊ नये म्हणून लगेच पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर सकाळपासूनच भाजप आमदार सावरकर यांच्या घरासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

हेही वाचा - Chandrakant Patil Statement On Sanjay Raut : 'संजय राऊत यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे'

'भाजपकडून पप्पू तर काँग्रेसचे चौकीदार' नारेबाजी -

काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेसने चौकीदार अशी नारेबाजी केली. तर भाजपकडून पप्पू अशी जोरदार नारेबाजी केली. नारेबाजी करताना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.