अकोला - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्वच सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार आजपासून कर्मचाऱ्यांची तपासणी सरकारी कार्यालयात करण्यात येत आहे.
कोरोना प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाय योजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. आरोग्य विभागाचे पथक विविध कार्यालयांमध्ये जाऊन कर्मचार्यांची तपासणी करीत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासनावर ताण वाढला आहे. परंतु, ही संख्या कमी होताना दिसून येत नाही.
हेही वाचा-पुणे शहरातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे पुन्हा जम्बो कोविड रूग्णालय सुरू
जिल्ह्यामध्ये आजतागायत 6 हजार 183 जण ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण
जिल्ह्यामध्ये नवीन कोरोना रुग्णासोबतच रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यामध्ये आजतागायत 6 हजार 183 जण ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व इतर ठिकाणी उपचार सुरू आहेत. यातील बरेच जण हे घरीच विलगीकरण पक्षात आहेत.
हेही वाचा-नागपुरात संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय
जीवनावश्यक वस्तू व इतर सर्व वस्तूंचा व्यापार करण्यासाठी परवानगी-
रुग्णांची संख्या दररोज 400 ते 500 अशा प्रमाणे संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून तपासणीचा वेग वाढविण्यात आला आहे. शासकीय कार्यालयात तपासणी करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तू व इतर सर्व वस्तूंचा व्यापार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. परंतु संबंधित व्यापारी आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतरच त्या दुकानदारास दुकान उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांची तपासणी जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.
हेही वाचा-महाराष्ट्रात जन्मलेल्या नवीन कोरोनामुळे रुग्णसंख्या वाढली -डॉ. भोंडवे
कोरोना प्रतिबंधाचाचे नियम काटेकोरपणे पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असले तरी अनेकजण कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे.