ETV Bharat / state

अकोल्यात फरसाणच्या दुकानांसह घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान - अकोला फरसाण दुकान आग बातमी

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. मुंबई आणि पुणे पाठोपाठ आज अकोल्यात आग लागली. बाजारपेठेतील फरसाण दुकानांना आग लागली.

Akola Farsan shops fire news
अकोला फरसाण दुकान आग बातमी
author img

By

Published : Mar 28, 2021, 9:16 AM IST

अकोला - जुना भाजीबाजारातील फरसाण दुकानांना आज(रविवार) पहाटे साडेचार वाजता आग लागली. या आगीमुळे दुकानांमागील घरानेही पेट घेतला. पाच दुकानांतील तेल जळल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे 20 बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

अकोल्यात फरसाणच्या पाच दुकानांना आग लागली

जुना भाजीबाजारात सिंधींची फरसाण दुकाने आहेत. याच दुकानांवर फरसाणचा कारखाना आहे. पहाटे या दुकानातून धूर निघत होता. त्यापाठोपाठ आगही दिसू लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण करून पाच दुकानांना आणि बाजूच्या घरालाही आपल्या कवेत घेतले. ही आग इतकी भयंकर होती की, तिच्यामुळे संपूर्ण बाजाराला आग लागल्यासारखे दृश्य निर्माण झाले होते.

लाखो रुपयांचे नुकसान -

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यास सुरुवात करताच दोन सिलेंडरचा स्फोट झाला. कारखान्यात असलेल्या तेलाच्या डब्यांनाही पेट घेतला. त्यामुळे ही आग आणखी तीव्र झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना परिश्रम घ्यावे लागले. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. आगीमध्ये 20 ते 25 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.