अकोला - कुरणखेड गावातील काटेपूर्णा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन होत असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी ६ जणांविरोधात बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील अन्य ३ आरोपींचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही वाळूचे दर दुप्पटच!
या उत्खननामुळे नदीवरील अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्गाच्या सार्वजनिक पुलाला धोका निर्माण होत होता. ही माहिती मिळताच खनिकर्म विभागाच्या जिल्हास्तरीय आकस्मिक धाड पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सार्वजनिक पुलाजवळ अवैधरित्या उत्खनन करताना ६ जण आढळून आले. यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.
हेही वाचा - पुर्णामध्ये सापडल्या डिटोनेटरच्या २० स्फोटक कांड्या, 'एटीएस' ने एकाला केली अटक
याप्रकरणी आरिफ खान नासिर खान, सैय्यद जाहीर सैय्यद जमील, सैय्यद नसरुल्ला सैय्यद अताउल्ला, मोईनोद्दीन शेकूद्दीन, आनंद आठवले, सैय्यद शारीक सैय्यद जमील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८ (७), (८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.