अकोला- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. अकोल्यात आज सकाळी २५ जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णाची संख्या जास्त आहे. त्यामुळे अकोल्यातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार, २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सहा महिला व १९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सहा जण अकोट येथील, पाच जण बाळापूर येथील, तीन जण महान येथील, तीन जण खोलेश्वर येथील, दोन जण चांदूर येथील तर उर्वरीत हिंगणा पारस, रजपूतपूरा, मलकापूर (अकोला), कोठारी वाटिका मलकापूर रोड, खडकी व शिवनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
सकाळच्या प्राप्त अहवालानुसार...
प्राप्त अहवाल- २५०
पॉझिटीव्ह- २५
निगेटीव्ह- २२५
जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती...
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- १८०१+२१= १८२२
मृत- ९१ (९०+१)
डिस्चार्ज- १३४४
ॲक्टीव्ह रुग्ण- ३८७
हेही वाचा- 'कोरोनाच्या संकटात दिलासा... गावगाड्यातील माणसाला मिळणार अतिरिक्त पाणी'