ETV Bharat / state

अकोट वगळता अकोला जिल्ह्यात 2 दिवस संपूर्ण संचारबंदी

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील संचारबंदीचा कलावधी 31 मे पर्यंत वाढवला आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातही वाढ करण्यात आली आहे. 19 व 20 मे ला संपूर्ण संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

2 days complete curfew in Akola district except Akot
अकोला जिल्ह्यात 2 दिवस संपूर्ण संचारबंदी
author img

By

Published : May 18, 2020, 5:23 PM IST

Updated : May 18, 2020, 6:54 PM IST

अकोला - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील संचारबंदीचा कलावधी 31 मे पर्यंत वाढवला आहे. त्यानुसार जिल्ह्यातही वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवार 19 व बुधवार 20 मे हे दोन दिवस संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या संचारबंदीतून अकोट उपविभागास वगळण्यात आले आहे.

अकोट वगळता अकोला जिल्ह्यात 2 दिवस संपूर्ण संचारबंदी
संचारबंदी कालावधीत जीवनावश्यक सेवा व ज्यांना संचारबंदीमधून सूट देण्यात आली आहे, त्याबाबी मात्र सकाळी सहा ते दुपारी एक या कालावधीतच सुरू ठेवता येणार आहेत. या संचारबंदीमधून कृषी व कृषी संबंधित सेवा संपूर्णपणे वगळण्यात आल्या आहेत. बँकांनाही नियमीत वेळेत कामकाज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याकाळात पीककर्ज वाटपाचे काम पूर्ण करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. जेथे जेथे प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत करण्यात आली आहेत. तेथील निर्बंध मात्र पूर्वीप्रमाणेच कायम राहतील, असेही त्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

Last Updated : May 18, 2020, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.