ETV Bharat / state

बिबट्याला पाहून हृदयविकाराचा झटक्याने महिलेचा मृत्यू; कुटुंबीयांची मदतीची मागणी - tiger fear in ahmednagar

शीलाबाई पानसरे या शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये काम करत होत्या. यावेळी त्यांच्यासमोर अचानक बिबट्या प्रकट झाला. समोर उभा ठाकलेल्या बिबट्याला पाहिल्यानंतर शीलाबाई यांची पाचावर धारण बसली. त्यांनी जवळ असलेल्या इतरांना मोठ्याने आवाज दिला. याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्या तिथेच कोसळल्या.

मृत शीलाबाई लहानु पानसरे
मृत शीलाबाई लहानु पानसरे
author img

By

Published : Jan 30, 2020, 2:15 PM IST

अहमदनगर - गावात जनावरांसाठी चारा घेत असलेल्या महिलेसमोर अचानकपणे बिबट्या आल्याने घाबरलेल्या महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. शीलाबाई लहानू पानसरे (रा. जाखुरी, ता. संगमनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

बिबट्याला पाहून हृदयविकाराचा झटक्याने महिलेचा मृत्यू; कुटुंबीयांची मदतीची मागणी

शीलाबाई पानसरे या शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये काम करत होत्या. यावेळी त्यांच्यासमोर अचानक बिबट्या प्रकट झाला. समोर उभा ठाकलेल्या बिबट्याला पाहिल्यानंतर शीलाबाई यांची पाचावर धारण बसली. त्यांनी जवळ असलेल्या इतरांना मोठ्याने आवाज दिला. याचवेळी त्यांना हृद्यविकाराचा झटका आल्याने त्या तिथेच कोसळल्या. मात्र, त्यांच्या आवाजाने आणि आसपासच्या लोकांचा झालेला गोंधळामुळे बिबट्या पळाला.

हेही वाचा - धक्कादायक! बीड जिल्हा रुग्णालयात सलाईनमध्ये आढळले 'शेवाळ'

यानंतर स्थानिकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. मृत शीलाबाई पानसरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तर शवविच्छेदनाच्या अहवालातही त्यांना हृद्यविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला तरच वनविभागाकडून मदत मिळते. मृत शीलाबाई यांना कोणतीही जखम झाली नाही. यामुळे मदत मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, हल्ला झाला नसला तरी बिबट्याच्या रोजच्या वावराने त्रस्त झालेल्या पानसरे कुटुंबीयांनी शासनाने मदत करावी, अशी मागणी केली आहे.

Intro:

ANCHOR_ अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जाखुरी गावात जनावरांसाठी चारा घेत असलेल्या महिलेसमोर अचानकपणे बिबटय़ा आल्याने घाबरलेल्या शीलाबाई लहानु पानसरे यांचा हृदयविकाराचा झटका येवुन म्रुत्यु झाला होता या महीलेच्या कुटुबीयांनी आता शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे....

VO_शीलाबाई पानसरे ह्या शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये काम करत असताना अचानक तांच्यासमोर बिबटय़ा प्रकट झाला. समोर उभा ठाकलेल्या बिबटय़ा बघतात शीलाबाई पानसरे यांची मोठी धावपळ उडाली त्यांनी मोठ्याने जवळ असलेल्या इतरांना आवाज दिला आणि त्यांना हद्यविकाराचा झटका आल्याने त्या शेतातच कोसळल्या होत्या त्यांच ओरडन आणि आसपासच्या लोकांचा झालेला गोंधळ या मुशे तिथुन बिबट्या तर पळुन गेला मात्र महीलेचा जागीच म्रूत्यू झाला होता येथील लोका़नी घडलेल्या प्रकाराची माहिती तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती त्या नंतर त्यांच्या देहाच शवविच्छेदन करुन अंत्य संस्कार करण्यात आले होते. पोस्टमार्टम रिपोट मध्येही हद्यविकाराचा झटका आल्याच निदान झालय...वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला तरच वनविभागाकडून मदत मिळते यांना कोणतीही जखम झाली नाही त्या मुळे मदत मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल मात्र हल्ला झाला नसला तरी बिबट्याच्या रोजच्या वावराने त्रस्त झालेल्या आणि आपल मानुस गमावलेल्या पानसरे कुटूबीयांनी शासनाने मदत करावी अशी मागणी केली आहे....

BITE_ तुकाराम पानसरे नातेवाईक

बाईट-प्रविण पानसरे मयताचा मुलगाBody:mh_ahm_shirdi_female death_30_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_female death_30_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.