शिर्डी (अहमदनगर) : मागील आठ दिवसांमध्ये सह्याद्री पर्वत रांगांमध्ये झालेल्या पावसामुळे अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे भंडारदरा, निळवंडे, भोजपूर, आढळा धरणात पाण्याची मोठी आवक झाली आहे. देवठाणजवळील आढळा धरण हे ओरफ्लो होऊन ( Adhala dam overflowed ) ( Due to Heavy Rains ) याचे पाणी चिखली येथे आले असून, या ओव्हर फ्लो पाण्याचे पूजन कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात ( Cancer Specialist Dr Jayshree Thorat ) यांच्या हस्ते करण्यात आले. चिखली येथील केरेवाडी पुलावरील आढळा नदीच्या पाण्याचे पूजन एकविरा फाउंडेशन अध्यक्षा डाॅ. जयश्री थोरात यांच्या हस्ते व जि.प. सदस्य रामहरी कातोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले. याप्रसंगी भास्कर सिनारे, विनोद हासे, आत्माराम हासे, सरपंच रवी बर्डे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींसह ग्रामस्थ व महिला भगिंनी उपस्थित होत्या.
आढळा धरण ओव्हरफ्लो : सह्याद्री पर्वत रांगेतील पाचपट्टा, आढळा खोऱ्यात भरपूर पाऊस झाल्याने आढाळा धरण ओव्हर फ्लो झाले. या धरणाचे पाणी प्रवरा नदीला मिळाले असून, राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणी केलेल्या साठवण बंधाऱ्यांमुळे पश्चिम भागातील हे बंधारे ओव्हरफ्लो होऊन हे पाणी चिखलीमध्ये आले आहे. याप्रसंगी डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, मागील पाच दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडेसह आढळा भोजापूर धरणात चांगले पाणी आले आहे.
आढळा धरणाचे जलपूजन : आढळा धरण हे सर्वात अगोदर पूर्ण भरले असून, भोजापूर धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. हे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंददायी आहे. पश्चिम भागात आढळा व म्हाळुंगी नदीवर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विविध ठिकाणी साखळी बंधारे निर्माण केले आहेत. यामुळे पाण्याची साठवण मोठी होत असून, त्याचा फायदा या भागातील नागरिकांना होत असतो. जलपूजन हा एक आनंदाचा क्षण असल्याचेही त्या म्हणाल्या.
पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा : तर जि.प. सदस्य रामहरी कातोरे म्हणाले की, पश्चिम भागात आमदार बाळासाहेब थोरात यांनी जेथे जागा असेल त्या ठिकाणी नदी, नाले, ओढे यावर सिमेंट बंधाऱ्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. यामुळे पाण्याची मोठी साठवण होत असून, या भागात समृद्धी निर्माण झाली आहे. पाण्याचा काटकसरीने वापरही होणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी साडीचोळी वाहून आढळा नदीचे पूजन करण्यात आले.