ETV Bharat / state

कर्जतमधील उपजिल्हा रुग्णालयात जंगली प्राण्यासह विलगीकरणात अवतरला छोटा भीम

कोरोना रुग्णांसाठी कर्जत, गायकरवाडी, मिरजगाव, राशीन या ठिकाणी विलगीकरण कक्षाचे नियोजन केले होते. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक संख्येने बाधित होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शालेय मुलांसाठी खास विलगीकरण कक्ष तयार केला आहे.

उपजिल्हा रुग्णालय
उपजिल्हा रुग्णालय
author img

By

Published : Jun 26, 2021, 11:44 AM IST

अहमदनगर - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. त्या वॉर्डमधील भिंतींवर छोटा भीम, रेल्वे, अंकगणित, हत्ती,जिराफ अशी रंगेबिरंगी आकर्षक चित्रे रेखाटून मुले हसती-खेळती राहावीत असे वातावरण केले आहे. संपूर्ण वॉर्डला शाळेचा लूक दिला आहे. तसेच मनमोहक विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

लहान मुलांसाठी विलगीकरण कक्ष
दुसऱ्या लाटेत आरोग्य प्रशासनाची उत्तम कामगिरीकर्जत येथील आरोग्य विभागाने अपुरे अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्येवर मात करत उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर केला आहे. आशा सेवकांची मदत घेऊन कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना केला. यातील कोणीही अतिरिक्त कामाचा ताण असल्याची जाणीव होऊ दिली नाही. कोरोना काळामध्ये आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन यामध्ये चांगला समन्वय दिसून आला. त्यामुळे कोरोना टेस्टिंग, सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यासाठी केलेल्या उपाययोजना यांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली.
लहान मुलांसाठी विलगीकरण कक्ष
लहान मुलांसाठी विलगीकरण कक्ष
लहान मुलांच्या कक्षाला शाळेचा लूककोरोना रुग्णांसाठी कर्जत, गायकरवाडी, मिरजगाव, राशीन या ठिकाणी विलगीकरण कक्षाचे नियोजन केले होते. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक संख्येने बाधित होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शालेय मुलांसाठी खास विलगीकरण कक्ष तयार केला आहे. मुलांना दवाखान्यात दाखल करण्यात आल्यानंतर ते दडपणाखाली राहू नयेत. ते खेळीमेळीच्या वातावरणात रहावेत यासाठी कक्षात बाराखडी, एबीसीडी, विविध प्राण्यांची चित्रे, कार्टून, सुविचार रंगेबेरंगी आणि आकर्षकपणे रेखाटली आहेत. शाळेत जसे वातावरण असते त्याप्रमाणे वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षण आणि मनोरंजनमुलांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून शालेय अभ्यास, जनरल नॉलेज, कार्टून फिल्म आदी दाखवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली जाईल. लहान मुले तर दवाखान्याचे नाव काढताच घाबरून रडतात. मुलांची निरागस मानसिकता असते. त्यात जर पालकांपासून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची वेळ आल्यास, त्यांना शाळेसारखे वातावरण दिले पाहिजे. जेणेकरून ते विलगीकरण कक्षात आनंदी राहतील.

चित्रे रेखाटणारे कलाकार तालुक्यातीलच
-कर्जत तालुक्यातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांवर लक्ष ठेवणारे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुंडलिक अवसरे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांचे सहकार्य लाभले. याचबरोबर चित्रकार रामदास फुले(गायकवाडी), मनोज सोनवणे(वडगाव तनपुरे), हरीचंद्रफणसे(लोणी मसदपूर) यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे हे सर्व कलाकार कर्जतमधीलच आहेत.

हेही वाचा - नागपुरात महिला होमगार्डशी अश्लील वर्तन; पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.