ETV Bharat / state

साईनगरीत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात - साई बाबांची आरती

सकाळच्या काकड आरतीनंतर साई बाबांची प्रतिमा, वीणा आणि साईसच्चरित ग्रंथांची मिरवणूक साई मंदिरापासून ते साईंच्या व्दारकामाई मंदिरापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर व्दारकामाईत अखंड पारायणाचे वाचन करुन मिरवणुकीला गुरूस्थान मंदिरामार्गे समाधी मंदिरात आणण्यात आले. आजपासून (गुरूवार) तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे.

Shirdi Saibaba: guru pournima festival begins
कसारा घाटात पुन्हा दरड कोसळली
author img

By

Published : Jul 22, 2021, 8:21 AM IST

शिर्डी (अहमदनगर) - साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून (गुरुवार) सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. यामुळे यंदाच्या वर्षीही शिर्डीत साई मंदिरात गुरूपौर्णिमा उत्सव हा साई संस्थानकडून अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.

साईनगरीत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात

तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात

गुरुवारी सकाळी काकड आरतीनंतर साई बाबांची प्रतिमा, वीणा आणि साईसच्चरित ग्रंथांची मिरवणूक साई मंदिरापासून ते व्दारकामाई मंदिरापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर व्दारकामाईत अखंड पारायणाचे वाचन करुन मिरवणुकीला गुरूस्थान मंदिर मार्गे समाधी मंदिरात आणण्यात आले. तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला गुरुवारी पहाटे सुरुवात झाली आहे.

असा सुरू झाला गुरुपौर्णिमा उत्सव -

साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला १९०८ साली साईबाबांच्या अनुमतीने सुरू करण्यात आले होते. साईबाबांचे परमभक्त तात्यासाहेब नुलकर व तात्या कोते पाटील तसेच काही भक्तांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांना आपले गुरु मानून त्यांची पूजा केली होती. त्यावेळीपासून शिर्डीमध्ये व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या उत्सवाला सुरुवात झाली आहे, असे सांगतिले जाते.

भाविकांविना गुरुपौर्णिमा उत्सव -

साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या काना-कोपऱ्यातून लाखो भक्त येतात. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणच्या शेकडो पालख्या शिर्डीत दाखल होत असतात. मात्र, गेल्या वर्षाभरापासून जगावर आणि देशावर आलेल्या कोरोना संकटामुळे साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. यदांच्या वर्षीही भाविकांविना साई संस्थांनला गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करावा लागत आहे.

मंदिराला विद्युत रोषणाई -

गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निम्मिताने शिर्डीतील ग्रामस्थ सुनिल बारहाते यांनी साई मंदिराला तसेच मंदिर परिसरातील व्दारकामाई मंदिर, चावडी मंदिर तसेच अन्य मंदिरांना विद्युत रोषणाईने रोषण केले आहे. यामुळे साई मंदिर आणि परिसर उजळून निघाला आहे. गेल्या वर्षीही बारहाते यांनी कोणताही मोबदला न घेता गुरुदक्षिणा म्हणुन रोषणाई केली होती. झगमगत्या लायटींगच्या जागी स्थिर लायटींगवर त्यांनी यंदा भर दिला आहे. साई मंदिराच्या कळासावर करण्यात आलेल्या लायटींगमध्ये ओम साई राम हे शब्द साकरण्यात आले आहे.

कोरोनाच्या सावटात साईची आराधना -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भक्तांविनाच गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत असलेले हे दुसरे वर्ष आहे. कोरोना प्रतिबंधामुळे उत्सव कालावधीत कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. तसेच, साई बाबांचा रथ तसेच पालखी मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

हेही वाचा - मंदिर बंद असतानाही साईबाबांच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.