अहमदनगर- काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक तसेच संगमनेर बाजार समितीचे उपसभापती सतीश कानवडे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. हा थोरातांना मोठा धक्का मानला जातोय. थोरात-विखे यांच्या राजकीय लढाईत विखेंनी थोरातांच्या गडाला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा-जागावाटपाचा तिढा भारत-पाकिस्तानच्या 'फाळणी'पेक्षाही कठीण - संजय राऊत
राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्हा भाजपमय करण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला सध्या मोठ-मोठे धक्के बसत आहेत. बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक सतीश कानवडे यांनी आज विखे पाटील यांच्या उपस्थित संगमनेर शहरातील मालपाणी हेल्थक्लब येथे भाजपमध्ये प्रवेश केला. कानवडे हे संगमनेर बाजार समितीचे उपसभापती आहे. बाळासाहेब थोरात यांच्या बरोबर अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. आता थोरात-विखे यांच्या राजकीय लढाईत विखेंनी थोरातांच्या गडाला सुरुंग लावण्यास सुरवात केली आहे. कानवडे यांनी आता भाजपात प्रवेश केल्याने बाळासाहेब थोरात यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. सतीश कानवडे यांची पुणतांबा येथून सुरू झालेल्या शेतकरी संपात महत्वाची भूमिका राहिली होती. किसान क्रांती कोर कमेटीचे कानवडे हे सदस्य होते.