अहमदनगर (शिर्डी)Sarpanch Padagrahan Miravnuk : अलिकडेच अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार (Gram Panchayat Election) पडल्या. यात राहाता तालुक्यातील निमगाव को-हाळे ग्रामपंचायत मध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या (Radhakrishna Vikhe Patil) जनसेवा मंडळाचे पाच सदस्यासह सरपंचपदी कैलास कातोरे हे विजयी झाले, तर त्याचबरोबर त्यांच्या विचाधारेचे सुजय पर्व पॅनलचे तात्या आण्णा गायकवाड हे विजयी झाले. आज कातोरे यांनी सरपंच पदभार स्विकारल्यानंतर एकाच विचार धारेचे जनसेवामंडळ आणि सुजय पर्व एकत्र येवून बहूमत सिद्ध करत उपसरपंच पदाचा मान सुजय पर्व पॅनलला देत, तात्या गायकवाड यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ पडली. विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पॅनल काम करत असून यापुढे फक्त विकासाचा ध्यास असेल असं मत यावेळी सरपंच कातोरे यांनी व्यक्त केलं.
पदभार केला स्वीकार : एखादा आमदार निवडून आल्यानंतर विजयाचा जसा जलोश केला जातो. तसच जलोश आज निमगाव को-हाळे ग्रामपंचायत (Korhale Gram Panchayat) निवडणूकमध्ये निवडून आलेल्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या पदभार स्वीकारण्याचा सोहळ्यात पहिला मिळलाय. गुलालाची उधळण आणि डिजेच्या तालावर गावातील महिलांनासह पुरुषांनी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी ठेका धरत एकच जल्लोष केलाय.
'या' गावांमध्ये निवडणुका बिनविरोध (Gram Panchayat Election Result) याआधी रत्नागिरी जिल्ह्यात 16 गावांमध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील सहा गावांमध्ये निवडणुका बिनविरोध झाल्यामुळं 10 गावांमध्ये मतदान झाले होते. या ठिकाणी कोणाचे वर्चस्व राहणार याकडं लक्ष लागून राहिलं होतं. दापोलीमध्ये कवडोली, मांदिवली, बांधतिवरे व डौली या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यातील डौली सरपंचपदी हरिश्चंद्र महाडीक, कवडोली सरपंचपदी प्रदीप चिंचघरकर हे विजयी झाले होते, तर बांधतिवरे आणि मांदिवली सरपंचपदी रिक्त असले तरी सदस्य हे योगेश कदम यांच्या विचारांचे आहेत. या सर्व विजयी उमेदवारांचे शिवसेना तालुकाप्रमुख उन्मेष राजे व पदाधिकार्यांनी अभिनंदन केलं.
हेही वाचा -