अहमदनगर - निवत्ती महाराज देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागीतली असल्याने तो विषय संपला आहे. मात्र, काही महिला केवळ प्रसिध्दीसाठी आंदोलनाची भाषा करत आवाज मोठा करत आहेत. अशा महिला हिंगणघाट, औरंगाबाद येथील घटनांच्या वेळी कुठे गेल्या होत्या, असा सवाल महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.
हेही वाचा - राज्यपाल-ठाकरे सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी; 'हा' निर्णय ठरला कारणीभूत
हेही वाचा - 'फीट इंडिया'साठी रेल्वे सरसावली.. ३० बैठका काढा अन् प्लॅटफॉर्म तिकीट मोफत मिळवा
इंदोरीकर महाराजांच्या विरोधात तृप्ती देसाई यांनी आवाज उठवत त्यांना काळे फासण्याची आणि मुख्यमंत्र्यांना कोंडण्याची भाषा केली आहे. मात्र, अशा महिलांच्या बाबतीत 'हाणू नाठाळाच्या माथी काठी' असेच म्हणाले लागेल, असेही त्या म्हणाल्या. राज्यात महिलांच्या वाढत्या अत्याचाराबाबत दिशा कायदा राज्यात लागू करण्यासाठी, तसेच याचा अभ्यास करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असल्याचे त्या म्हणाल्या.