अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता. यात भर टाकत राष्ट्रवादी पक्षाचे आमदार वैभव पिचड यांना विखे पाटील भाजपमध्ये घेऊन जाणार असल्याने आता राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहे.
एकेकाळी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करत सगळे राजकीय गणितच बदलवून टाकले. लोकसभेसा निवडणुकीच्या वेळेस विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांच्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने नगर दक्षिणची जागा दिली सोडली नव्हती. यामुळे नाराज विखेंनी भाजपात प्रवेश केला होता.
गेल्या काही दिवसांपुर्वी श्रीरामपुर येथील एका कार्यक्रमात ज्यांना निवडून यायचे आहे त्यांनी आमच्याबरोबर यावे असे वक्तव्य विखेंनी केले होते. त्यामुळे आता अकोले पाठोपाट श्रीरामपुर मधूनही ते कोणाला शिवसेनेत आणतात हे पहाणे महत्वाचे ठरेल. तर, नगर जिल्ह्यातील बाराही जागांवर आगामी विधानसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार निवडुन येतील ह्या केलेल्या वक्तव्याची रणनीती आखण्यासही विखे पाटलांनी सुरवात केली असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणूकी दरम्यान संगमनेरचे काँग्रेस पक्षाचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखे कुटुंबियांवर टिका सुरु केली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विखे पाटील यांनी संगमनेरवर जास्त लक्ष केंद्रीत केले असल्याचे बोलले जात आहे.
यातच बुधवारी रात्री विखे आणि अकोले तालुक्याचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार वैभव पिचड यांनी वर्षावर मुख्यमंत्री यांची भेट घेतल्याने वैभव पिचड भाजप मध्येप्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात वैभव पिचड हे राष्ट्रवादीचे एकच आमदार आहेत. आता त्यांनाही भाजपाच्या गोटात आणले तर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असेल असे समजले जात आहे.