ETV Bharat / state

शिर्डी लोकसभा: लोखंडे विरुद्ध कांबळे काँटे की टक्कर, अपक्ष वाकचौरेंच्या उमेदवारीने रंगत - bhausaheb vakchre

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलच तापले आहे. या मतदारसंघातून युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे तर त्यांच्याविरोधात काँग्रसने आमदार भाऊसाहेब कांबळेंना मैदानात उतरवले आहे. तर भाऊसाहेब वाकचौरे हे अपक्ष निवडणुक लढवत असल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

शिर्डी लोकसभा
author img

By

Published : Apr 22, 2019, 12:27 PM IST

Updated : Apr 22, 2019, 3:31 PM IST

अहमदनगर - पुर्वीचा कोपरगाव लोकसभा मतदारसंघ २००९ च्या पुनर्रचनेनंतर शिर्डी लोकसभा म्हणून अस्तित्वात आला. पूर्वीपासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात दिवंगत बाळासाहेब विखे पाटील सर्वाधिक काळ खासदार राहिले आहेत. २००९ नंतर हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी आरक्षीत झाला. यावेळी या मतदारसंघातून युतीकडून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे हे मैदानात उतरलेत. तर भाऊसाहेब वाकचौरे हे अपक्ष निवडणूक लढवत असल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

मतदारसंघ पुर्नरचनेत २००९ साली हा मतदारसंघ अनुसुचीत जातीसाठी आरक्षीत झाला. या पहील्याच निवडणुकीत आघाडीने ही जागा आर. पी. आयसाठी सोडली आणि रामदास आठवले या मतदारसंघातून उभे राहीले. त्यांच्यासमोर साईबाबा संस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरेंना शिवसेनेने उमेदवारी दिली. या निवडणुकीच्या रणधुमाळीत अॅट्रोसीटीचा मुद्दा समोर आला. त्यानंतर आठवलेंचा या मतदारसंघात पराभव झाला. ५ वर्ष चांगले काम करुनही वाकचौरेंनी मोदी लाट असतानाही २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना पराभव पत्कारावा लागला. २०१४ साली सदाशिव लोखंडे यांनी त्यांचा पराभव केला होता.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून एकुण 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथून शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंना पुन्हा संधी दिली आहे. काँग्रेसने यावेळी श्रीरामपुरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. शिर्डीची जागा ही शिवसेनेकडे असल्याने भाजपमध्ये असलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी सेनेच्या गोटात जावुन तिकीट मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न आल्याने मतदारसंघात असलेल्या संपर्काच्या बळावर ते अपक्ष उमेदवार म्हणुन निवडणूक रिंगणात आहेत. लोखंडे, वाकचौरे आणि कांबळे यांच्यात प्रमुख लढत असली तरी या मतदारसंघात बसपा, वंचीत आघाडी आणि भाकपनेही आपले उमेदवार उभे केले आहेत.

निळवंडे धरणाच्या पाण्याचा प्रश्न

शिर्डी मतदारसंघात सध्या निळवंडे धरणाच्या रखडलेल्या कालव्यांच्या कामावरुन राजकारण सुरू आहे. निळवंडे कालव्यांचा प्रश्न प्रस्थापित नेत्यांची डोकेदुखी ठरत आहे. 182 गावांच्या पाण्याचा हा ज्वलंत प्रश्न आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीसह भाजपा आणि शिवसेनेकडून श्रेयाचं राजकारण सुरू आहे. गेल्या चार दशकांपासून निळवंडे धरणाच्या कामावरूनच लोकसभा निवडणुका लढवल्या जात आहेत. शिर्डी साईबाबा संस्थानने कालव्यांच्या कामासाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यावरुन श्रेयवाद सुरू आहे.

पक्षीय बलाबल

या मतदारसंघात ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. यामध्ये काँग्रेसकचे ३, भाजपचे २ तर राष्ट्रवादीचे एका जागेवर वर्चस्व आहे.

श्रीरामपूर - उमेदवार भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (काँग्रेस)
संगमनेर- बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
कोपरगाव - स्नेहलता कोल्हे (भाजप)
नेवासा - बाळासाहेब मुरकुटे (भाजप)
अकोले - वैभव पिचाड (राष्ट्रवादी)

२०१४ च्या निवडणुकीत अवघ्या १५ दिवसात शिवसेनेच्या सदाशिव लोखंडेंना मोदी लाटेत मतदारांनी निवडूण दिले होते. मोदी लाटेत १५ दिवसात खासदार झालेल्या लोखंडेंचा मतदारसंघात फारसा संपर्क राहीला नाही. ५ वर्षात त्यांनी खासदारकीचा मोठा निधी मतदारसंघात खर्च केला आहे. गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी केंद्रातून 22 कोटींचा निधी आणण्यासाठी पाठपुरावा केला आहे. मतदारसंघात ८ कृषी प्रोड्युसर कंपन्या आणल्या आहेत. संसदेत त्यांचा सक्रीय सहभाग राहीला आहे.

श्रीरामपुर मतदारसंघाचे आमदार आणि शांत स्वभाव म्हणून ओळखले जाणाऱ्या भाऊसाहेब कांबळेंना यावेळी काँग्रेसकडून उमदेवारी देण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील गटाचे कांबळे असले तर ते सध्या बाळासाहेब थोरात यांच्या गटात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखेंना राष्ट्रवादी काँग्रेसने नगरची जागा त्यांच्यासाठी न सोडल्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यात राधाकृष्ण विखे पाटील जाहीर प्रचारापासून दुर राहील्याने थोरांताची साथ घेत कोरीपाटी असलेले कांबळे निवडणुकीत उतरले आहेत.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये जाऊन पराभवाचे चटके सोसणाऱ्या वाकचौरे हे या निवडणुकीत अपक्ष म्हणुन आपले नशीब अजमावत आहेत. मतदारसंघात सातत्याने असलेला संपर्क उच्चशिक्षीत उमेदवार आणि २००९ ते २००४ या काळात केलेल्या कामावर ते मते मागत आहेत.

नगर दक्षिणेतून खासदार होण्यासाठी सुजय विखेंनी भाजापमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे वडील राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये असल्याचे सांगातात. मात्र, दक्षिणेत युतीच्या लोकांबरोबर मांडीला मांडी लावुन बसतात. सुजय विखेंसाठी शिर्डी लोकसभेतील विखेसमर्थ तीकडे कमळ हातात धरतात. मात्र, उत्तरेत राधाकृष्ण विखे पाटील सांगतील ती भुमिका घेणार असल्याचे चित्र आहे.

शिर्डी लोकसभेत भाऊसाहेब कांबळेंच्या मागे विखे विरोधक बाळासाहेब थोरांतांनी आपली ताकद उभी केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीसह सर्व विखे विरोधकांची एकत्र मोट त्यांना बांधली आहे. तर सदाशिव लोखंडेसाठी युतीच्या नेत्यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. मात्र, यामध्ये आता कोण बाज मारणार हा येणारा काळच ठरवेण.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 22, 2019, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.