ETV Bharat / state

कोरोना संपलेला नाही, प्रत्येकाने काळजी घ्या - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात - अहमदनगर संगमनेर न्यूज

कोरोनाबाबत नागरिकांना आवाहन करताना थोरात म्हणाले आहे की, 'कोरोना हे संपूर्ण मानव जातीवरील संकट आहे. मागील एका वर्षापासून संपूर्ण जग कोरोनामुळे हतबल झाले आहे. कोरोनाचे संकट रोखण्यासाठी स्वयंशिस्त अत्यंत महत्त्वाची असून विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, कुठेही जास्त गर्दी करू नका, घरगुती समारंभ कमीत कमी उपस्थितीमध्ये करा किंवा शक्य असल्यास असे समारंभ टाळा, काही आजारपणाची लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या.'

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात न्यूज
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात न्यूज
author img

By

Published : Feb 20, 2021, 5:19 PM IST

संगमनेर (अहमदनगर) - 'मागील एका वर्षापासून संपूर्ण मानव जातीवर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. महाराष्ट्रात कोरोना रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले असून या काळात नागरिकांचेही मोठे सहकार्य लाभले. मात्र, लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर कोरोनाबाबत अनेकांकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे सध्या पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढत आहे. म्हणून प्रत्येकाने मास्क वापरण्यासह स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी,' असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

वाढणारी गर्दी हा चिंतेचा विषय - महसूल मंत्री

कोरोनाबाबत नागरिकांना आवाहन करताना थोरात म्हणाले आहे की, 'कोरोना हे संपूर्ण मानव जातीवरील संकट आहे. मागील एका वर्षापासून संपूर्ण जग कोरोनामुळे हतबल झाले आहे. महाराष्ट्रात कोरोना रोखण्यात सरकारला चांगले यश आले. याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. कोरोनाची लसही महाराष्ट्रात उपलब्ध झाली आहे, हे मोठे यश आहे. मात्र लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर कोरोनाबाबत काही जणांकडून झालेला निष्काळजीपणा, अनेक ठिकाणी वाढणारी गर्दी हा चिंतेचा विषय ठरला आहे. सध्या काही शहरांत कोरोनाचा धोका वाढतो आहे.'

शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

महाविकास आघाडी सरकारने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या योजनेअंतर्गत केलेल्या आरोग्य सर्वेक्षणामुळे महाराष्ट्रात कोरोना रोखण्यापासून चांगला दिलासा मिळाला आहे. कोरोनाचे संकट रोखण्यासाठी स्वयंशिस्त अत्यंत महत्त्वाची असून विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, कुठेही जास्त गर्दी करू नका, घरगुती समारंभ कमीत कमी उपस्थितीमध्ये करा किंवा शक्य असल्यास असे समारंभ टाळा, काही आजारपणाची लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या. निष्काळजीपणा करु नका. शासनाच्या नियमांचे पालन करा,' असे आवाहनही महसूलमंत्री थोरात यांनी जनतेला केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.