ETV Bharat / state

पाथर्डी तालुक्यात रास्ता रोको; चिचोंडी-तिसगाव रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी - road

पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी, तिसगाव या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे येथील रस्त्यावर मोठाले खड्डे पडले असून हा मार्ग वाहतूकीसाठी योग्य राहिला नसल्याचे म्हणत नागरिकांनी चिंचोडीत रास्ता रोको आंदोलन केले.

ahmednagar
पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे रास्ता रोको आंदोलन
author img

By

Published : Dec 27, 2019, 10:31 AM IST

अहमदनगर - चिचोंडी, तिसगाव या गावांना जोडणाऱ्या साडेसहा कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप पाथर्डी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे यांनी केला आहे. तसेच याविरोधात त्यांनी चिचोंडी येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे.

पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे रास्ता रोको आंदोलन

पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी, तिसगाव या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधण्यात आलेला हा रस्ता सुमारे १५ किमी लांबीचा असून, या रस्त्यावर अनेक ठिकाणी पूलही आहेत. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील काही पूलही वाहून गेले आहेत. तसेच ठिकठिकाणी खडी वाहून गेल्यामुळे रस्त्याला मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी करण्यात येत आहे. मात्र, याला शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पुलाच्या कामासाठी ठेकेदाराने फुटलेले पाईप टाकल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. तर, हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिला नसल्याचे पालवे म्हणाले. या रस्त्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

हेही वाचा - शिक्षक विद्यार्थिनींशी करायचा अश्लील चाळे; पालकांनी दिला चोप, व्हीडिओ व्हायरल

सुमारे २ तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता महेंद्र मुंगसे यांनी येऊन हा रस्ता परत चांगल्या स्थितीत आणण्याचे आश्वासन यावेळी आंदोलनकर्त्यांना दिले. या आंदोलनात गावकरी तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी भाग घेतला होता. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त केला नाही तर, परत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

हेही वाचा - जामखेड-मुंबई एसटी बसवर काळाचा घाला; चार प्रवासी ठार, सोळा जखमी

Intro:पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,Body:पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,

चिचोंडी,तिसगाव या या गावांना जोडणाऱ्या साडेसहा कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप पाथर्डी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे यांनी केला आहे,
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे पंधरा किलोमीटर लांबीचा हा रस्ता असून, या रस्त्यावर अनेक ठिकाणी पूल ही आहेत, आत्ता झालेल्या अतिवृष्टीमुळे हे पूलही वाहून गेले आहेत, तसेच रस्त्याला ठिकाणी खडी वाहून गेल्यामुळे मोठ मोठाले खड्डे पडले आहेत, तसेच पुलाच्या कामासाठी ठेकेदाराने फुटलेले पाईप टाकल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला,त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नसल्याचा आरोप यावेळी पालवे यांनी केला, ह्या रस्त्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या या हस्ते करण्यात आले होते, सुमारे दोन तास चाललेल्या रास्तारोको आंदोलनामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता महेंद्र मुंगसे यांनी येऊन हा रस्ता परत चांगल्या स्थितीत आणण्याचे आश्वासन यावेळी आंदोलन करते यांना दिले, ये वेळी या आंदोलनात गावकरी तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी भाग घेतला होता, जर हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त केला नाहीतर परत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलन करते यांनी केला,Conclusion:पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.