ETV Bharat / state

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची रामदास आठवलेंनी केली मागणी - रामदास आठवले पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण प्रतिक्रिया

पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.

Ramdas Athawale
रामदास आठवले
author img

By

Published : Feb 14, 2021, 9:02 AM IST

अहमदनगर - राज्यात चर्चेत असलेले पूजा चव्हाण या तरुणीचे आत्महत्या प्रकरण हे गंभीर प्रकरण आहे. त्याची पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलताना आठवले यांनी ही मागणी केली. पुणे पोलीस गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे कारवाई करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची रामदास आठवलेंची मागणी
'हम दो हमारे दो'वरून राहुल गांधींना चिमटा -

काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर 'हम दो हमारे दो' अशी टीका केली होती. यावर भाष्य करताना आठवले यांनी राहुल गांधींनी लग्न करावे म्हणजे, त्यांचे हम दो हमारे दो चे स्वप्न पूर्ण होईल, असा चिमटा काढला. त्याच बरोबर राहुल गांधींनी मोदी-शाह आणि अदानी-अंबानी यांच्यावर केलेली टीका चुकीची असल्याचे आठवले म्हणाले. अदानी-अंबानी हे मोठे उद्योगपती आहेत त्यांना आम्ही मोठे करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

हा राज्यपालांचा नव्हे राज्याचा अपमान -

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विमान प्रवास नाकारला. हा फक्त राज्यपालांचा अपमान झाला नसून महाराष्ट्राचा अपमान असल्याचे आठवले यांनी सांगितले. आपल्या राज्याची अशी परंपरा नसून राज्यपाल हे आयएएस-आयपीएस यांच्या कार्यक्रमासाठी जात होते. विमानात काही खराबी असेल तर अगोदरच राज्यपालांना कल्पना देणे गरजेचे होते, असेही आठवले म्हणाले.

पाचही राज्यात लढवणार निवडणूक -

तामिळनाडू, केरळ, पाँडेचेरी, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये येत्या काळात विधानसभा निवडणुका आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकात आरपीआय आठवले गट जागा लढवणार आहे. या सर्व राज्यात पक्षाचे संघटन असल्याचे आठवले यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा यांना आपण भेटणार असून आमच्या पक्षासाठी जागा मागणार आहोत. आम्हाला भाजपने जागा न दिल्यास काही निवडक ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू आणि इतर ठिकाणी भाजपला पाठिंबा देऊ, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

आठवलेंनी शीघ्र कविता अर्धवटच सोडली -

खासदार रामदास आठवले हे राजकीय शीघ्र कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विनोदी आणि मार्मिक चारोळ्यांमुळे सभागृहात तसेच अनेक सभा-मेळाव्यात मनोरंजन होते. अहमदनगर इथे पत्रकारांनी त्यांना राहुल गांधींच्या 'हम दो हमारे दो' या केलेल्या भाष्यावर शीघ्र कवितेचा आग्रह केला. आठवले यांनी कविता तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो जमत नसल्याचे पाहून हसत-हसत काढता पाय घेतला. त्यानंतर उपस्थितीतांमध्ये एकच हशा झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.