ETV Bharat / state

Raj Thackeray Aurangabad Rally : अहमदनगरमध्ये राज ठाकरेंचे भव्य स्वागत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार ( Raj Thackeray Aurangabad Rally News ) आहे. या सभेकडे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे. राज ठाकरे सभेत काय बोलणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. या सभेसाठी जाण्यासाठी राज ठाकरे शनिवारी ( दि. 30 एप्रिल ) अहमदनगरमार्गे औरंगाबादकडे रवाना झाले. अहमदनगरमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात ( Raj Thackeray Ahmednagar News ) आले.

author img

By

Published : Apr 30, 2022, 7:15 PM IST

Updated : Apr 30, 2022, 8:39 PM IST

छायाचित्र
छायाचित्र

अहमदनगर/औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार ( Raj Thackeray Aurangabad Rally News ) आहे. या सभेकडे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे. राज ठाकरे सभेत काय बोलणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. या सभेसाठी जाण्यासाठी राज ठाकरे शनिवारी ( दि. 30 एप्रिल ) अहमदनगरमार्गे औरंगाबादकडे रवाना झाले. अहमदनगरमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

अहमदनगर जवळ असलेल्या केडगाव या ठिकाणी त्यांनी दुपारचे जेवण केले आणि त्यानंतर अहमदनगर शहरात त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ स्वागत करण्यात आले. या ठिकाणी प्रचंड गर्दी राज ठाकरे यांना पाहण्यासाठी उपस्थित होती. मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे चाहते विशेष करून युवकवर्ग आपल्याकरडील मोबाइल वर उंचावून राज ठाकरेंची एक छबी टिपण्यासाठी आतूर होते. मात्र, राज ठाकरे हे वाहनाच्या बाहेर न येता वाहनाच्या टपाच्या खिडकीतून उभे राहून कार्यकर्ते आणि चहात्यांचे अभिवादन स्वीकारले. यानंतर हा ताफा औरंगाबादकडे रवाना झाला. यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा होता. जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी सचिन डफळ, देविदास खेडकर, नितीन भुतारे, मनोज राऊत, केतन नवले आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - MNS Organise Iftar Party : 'भोंग्या'मुळे तापलेल्या वातावरणात शिर्डीत मनसेची इफ्तार पार्टी

Last Updated : Apr 30, 2022, 8:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.