ETV Bharat / state

राहुल गांधींनी संगमनेरमध्ये घेतला पिठलं-भाकरीचा आस्वाद

राहुल गांधी यांनी रात्रीच्या जेवणात मराठमोळ्या पदार्थाचा आस्वाद घेतला. यात पिठलं भाकरीचा समावेश होता. तर सकाळी दही व थालपीठ याचा आस्वाद घेतल्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना झाले.

राहुल गांधींनी संगमनेर येथे घेतला पिठलं भाकरीचा आस्वाद
author img

By

Published : Apr 27, 2019, 5:30 PM IST

अहमदनगर - दिल्लीला जाण्यासाठी उशीर झाल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संगमनेर येथे मुक्काम केला. राहुल गांधी यांनी रात्रीच्या जेवणात मराठमोळ्या पदार्थाचा आस्वाद घेतला. यात पिठलं भाकरीचा समावेश होता. तर सकाळी दही व थालपीठ याचा आस्वाद घेतल्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना झाले.

शुक्रवारी सकाळी दिल्लीहून निघाल्यानंतर त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यांना अर्ध्या रस्त्यातून दिल्लीला परत जावे लागले. त्यामुळे दिवसभराचा सगळा कार्यक्रम २ तास उशिराने सुरू झाला.

राहुल गांधी हे दिल्ली, बंगाल व ओडीशाचा दौरा करून संगमनेर येथे आले होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी त्यांनी संगमनेर येथे सभा घेतली. दिल्लीला जाण्यासाठी रात्री उशीर झाल्याने राहुल गांधी यांनी संगमनेरमध्ये मुक्काम केला. संगमनेरमधील एका कपड्याच्या दुकानातून त्यांनी कपडे खरेदी केले. संगमनेरमध्ये एका महाविद्यालयाच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी रात्री मुक्काम केला.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

राहुल गांधीचा संगमनेर येथे अकस्मात मुक्काम रात्री कपडे धुवून सकाळी पुढच्या दौऱ्यासाठी गांधी रवाना झालेय..काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काल शिर्डी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळी यांच्या प्रचारार्थ आले होते....रात्री उशिरा झाल्याने गांधीनी आपला मुक्कम संगमनेरात ठेवला त्यांच्या सोबत कपडे नव्हती. रात्री साडेअकरा वाजता संगमनेर मधील एका कापड दुकनातून शाॅर्ट, टी शर्ट खरेदी केले.अंगावरचे कपडे रात्रीच धुवून सकाळ साठी तयार केले. संगमनेर काॅलेजच्या एका लहानशा गेस्ट हाऊस मधे राहुल गांधी यांनी काल रात्री अचानक मुक्काम केला आहे....

काल सकाळी दिल्लीहून निघाल्यानंतर त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं बंगाल ला जात असताना त्यांना अर्ध्या रस्त्यातून माघारी दिल्लीला फिरावे लागले. त्यामुळं दिवसभराचा सगळा कार्यक्रम दोन तास उशिरानं सुरू झाला. दिल्ली ते बंगाल व ओडीसाचा दौरा करून राहुल गांधी शिर्डी लोकसभेचे काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी संगमनेर ला रात्री साडेनऊ वाजता पोहचले. सभा दहा वाजता संपली. त्यानंतर दिल्लीला परत जाण्याऐवजी राहुल यांनी संगमनेरलाच मुक्काम करण्याचे ठरवले..तसेच रात्री राहुल गांधी यांनी मराठमोळं जेवण घेतलं. त्यामधे पिठलं व भाकरीचा आस्वादही घेतला.सकाळी राहुल यांनी दहि व थालपिठावर ताव मारला. रात्रीची धुतलेली कपडे घालून आज दिवसभराच्या कार्यक्रमासाठी सकाळी रवाना झाले आहे.... Body:27 April Shirdi Rahul Gandhi Conclusion:27 April Shirdi Rahul Gandhi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.