ETV Bharat / state

२ दिवसात माध्यमासमोर आपली भूमिका मांडणार - राधाकृष्ण विखे-पाटील

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (बुधवारी) अहमदनगर येथे अनौपचारिक बोलताना विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला नसल्याचे सांगितले.

author img

By

Published : Mar 13, 2019, 6:06 PM IST

Ahemadnagar

अहमदनगर - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (बुधवारी) अहमदनगर येथे अनौपचारिक बोलताना विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला नसल्याचे सांगितले. त्याबरोबरच याबाबतची आपली भूमिका येत्या २ दिवसात माध्यमांसमोर स्पष्ट करू, असे सांगितले.

काँग्रेसकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळाली नसल्यामुळे डॉ. सुजय विखे-पाटलांनी मंगळवारी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे. त्यानंतर सुजयचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची पुढील भूमिका काय असणार, याबद्दल राज्यात सर्वत्र उत्सुकता आहे. त्याबरोबरच काँग्रेसकडून त्यांच्यावर कोणती कारवाई होऊ शकते का? याबद्दलही तर्कवितर्क लढवले जात आहेत.

२ दिवसात माध्यमासमोर आपली भूमिका मांडणार

राधाकृष्ण विखे-पाटील हे पदाचा राजीनामा देतात की पक्षात राहतात, की भाजपमध्ये प्रवेश करणार याबद्दल मोठी उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे. काल रात्रीपर्यंत राधाकृष्ण विखे हे दिल्लीमध्ये तळ ठोकून होते. रात्री उशिरा ते लोणीमध्ये आले. त्यानंतर नगर मार्गे तुळजापूरकडे जाताना त्यांनी नगरमध्ये मोजक्या लोकांशी चर्चा केली. या चर्चेत विखे यांनी आपण आपली भूमिका येत्या २ दिवसात स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर काही माध्यमांमध्ये माझ्या राजीनाम्याच्या येणाऱ्या बातम्या या चुकीच्या आहेत. काहींना माझ्या राजीनाम्याची घाई झाली असल्याचा टोला त्यांनी राजकीय विरोधकांना लगावला. त्यामुळे आता विखे-पाटील येत्या २ दिवसात आपली कोणती पुढील दिशा ठरवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:अहमदनगर- राधाकृष्ण विखे पाटील येत्या दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार, राजीनामाच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्टीकरण..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- राधाकृष्ण विखे पाटील येत्या दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार, राजीनामाच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्टीकरण..

अहमदनगर- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अहमदनगर येथे अनौपचारिक बोलताना आपण आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला नसल्याचे सांगतानाच याबाबतची भूमिका आपण येत्या दोन दिवसात माध्यमांसमोर स्पष्ट करू असं सांगितलं. डॉक्टर सुजय विखे यांनी काँग्रेस पक्षाकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी न मिळाल्याने कालच(मंगळवारी)भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर सुजय यांचे वडील आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची पुढील भूमिका काय असणार याबद्दल राज्यात सर्वत्र उत्सुकता आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर कोणती कारवाई होऊ शकते का याबद्दलही तर्कवितर्क लढवले जात असताना आता राधाकृष्ण विखे हे पदाचा राजीनामा देत पक्षात राहतात, की पदाचा राजीनाम्यासह पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे. काल रात्रीपर्यंत राधाकृष्ण विखे ही दिल्लीमध्ये तळ ठोकून होते. रात्री उशिरा ते लोणी मध्ये आले त्यानंतर नगर मार्गे तुळजापूर कडे जाताना त्यांनी नगरमध्ये मोजक्या लोकांशी चर्चा केली. या चर्चेत विखे यांनी आपण आपली भूमिका येत्या दोन दिवसात स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर काही माध्यमांमध्ये माझ्या राजीनाम्याच्या येणाऱ्या बातम्या ह्या चुकीच्या असून काहींना माझ्या राजीनाम्याची घाई झाली असल्याचा टोला त्यांनी आपल्या राजकिय विरोधकांना लगावला. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे येत्या दोन दिवसात आपली कोणती पुढील दिशा ठरवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

-राजेंद्र त्रिमुखे अहमदनगरConclusion:अहमदनगर- राधाकृष्ण विखे पाटील येत्या दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार, राजीनामाच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्टीकरण..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.