अहमदनगर - कोरोना प्रतिबंधक लशीचे उत्पादन करण्यास मर्यादा असून एका रात्रीत लस तयार होत नाही, असे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे मालक आदर पूनावाला ब्रिटनमध्ये जाऊन जे बोलले ते खरच बोलले. 135 कोटी लोकसंख्येच्या देशासाठी एका रात्रीत लस उत्पादित करणे शक्य नाही, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पूनावाला यांची पाठराखण केली.
हेही वाचा - पोलिसांवर हल्ल्याप्रकरणी चार जण अटकेत, न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलीस कोठडी
पूनावाला यांना कोणी दम दिला, हे तपासले पाहिजे
लस पाहिजे म्हणून सीरम इन्स्टिट्यूटचे मालक आदर पूनावाला यांना कोणी दम दिला, हे तपासले पाहिजे. ज्या व्यक्तीने महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे काम केले आहे, त्यांना कोणी धमकावले? त्यांना त्रास देण्याचा हेतू कोणाचा आहे? हे शोधलच पाहिजे. सीरमकडून मोठ्या अपेक्षा महाराष्ट्रासह देशालाही आहेत. त्यांच्याकडून त्या पूर्ण करून घेण्याचे काम करायला पाहिजे, असे थोरात म्हणाले.
महसूलमंत्री यांनी केली पूनावाला यांची पाठराखण
लस पाहिजे म्हणून सगळे जण पूनावाला यांना दमच देत सुटले, मात्र ब्रिटेनमध्ये जाऊन ते जे बोलले, ते खरेच बोलले. एवढ्या मोठ्या देशासाठी एका रात्रीत लस बनविता येऊ शकत नाही. त्यांचे हे म्हणणे खरेच आहे. पूनावाला हे काही राजकारणी नाहीत. शिवाय ते जे काही सांगत आहेत त्यात तथ्य आहे. त्यामुळे, उत्पादनातील मर्यादा लक्षात घेऊन आपण लसीकरणाचे नियोजन केले पाहिजे. जेवढा कोटा मिळत आहे, त्याचे काळजीपूर्वक नियोजन केले पाहिजे. राज्याला जास्त कोटा मिळावा म्हणून आपण प्रयत्न करत असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात शिर्डीत म्हणाले.
केंद्र सरकारचा महाराष्ट्रकडे कानाडोळा
केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकरावर अनेक बाबतीत अन्याय केला आहे. परदेशातून जी मदत देशाला येत आहे, त्यात महाराष्ट्राला वाटा नाही. आज लसीकरणाला आपन सर्व जण तयार आहे, मात्र लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली असल्याने आपल्याला पाहिजे तेवढे लसीचे डोस केंद्र सरकारकडून मिळत नाही. अशा अनेक बाबतीत केंद्र सरकार महाराष्ट्राकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
हेही वाचा - अहमदनगरमधील 'हे' कोविड सेंटर बनले आहे चर्चेचा विषय, वाचा...