अहमदनगर - संगमनेर येथे शनिवारी अहमदनगर जिल्हा परिषदेच्यावतीने प्रगतशील शेतकरी आणि आदर्श गोपालकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते. थोरात यांनी आपल्या भाषणात, सरकारने सातत्याने कर्जमाफी करण्यापेक्षा या प्रश्नावर काही तरी शाश्वत उपाय शोधने गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा... 'सारथी'ची स्वायत्तता राहणार कायम.. उद्धव ठाकरेंच्या शब्दानंतर संभाजीराजेंचे उपोषण मागे
संगमनेर येथे शनिवारी प्रगतशील शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना आदर्श गोपालक पुरस्कार देण्यात आला. यावेळी अहमदनगर जिल्हातील कर्जत, जामखेड, आकोले, संगमनेर, श्रीगोंदा ,पारनेर, नेवासा यांसह अन्य तालुक्यातील एकून 90 शेतकऱयांना सन्मानीत करण्यात आले.
हेही वाचा... 'मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, आता त्यांचा गोंधळ उडालाय'
कर्जमाफीपेक्षा काही तरी शाश्वत उपाय शोधणे आवश्यक...
राज्यात महाविकास आघाडी सरकारने, शेतकऱ्यांची दोन लाख रूपये पर्यंतच्या रकमेची कर्जमाफी केली आहे. तसेच दोन लाखांच्यावर असेल्या कर्जदार शेतकऱ्यांचाही आम्ही विचार करत आहोत. मात्र कर्जमाफी किती दा द्यायची, हा प्रश्न आहे? या समस्येवर काहीतरी शाश्वस्त उपाय काढावा लागेल, असे वक्तव्य महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात केले.
हेही वाचा... 'संपूर्ण देश तुझ्या सोबत' केरळच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आयेशी घोषची भेट