ETV Bharat / state

जीव वाचविण्याच्या धडपडीत मोर पडला विहिरीत; प्राणीमित्रांनी दिले जीवदान

शिर्डी जवळील राहाता १५ चारी शिवारात १०० फुट खोल विहिरीत पडलेल्या मोराला प्राणी मित्रांच्या प्रयत्नांतून जिवदान मिळाले आहे. कुत्रे मागे लागल्याने हा मोर जीव वाचवण्यासाठी धडपड करत असताना विहिरीत पडला आणि जखमी झाला. दरम्यान, जखमी मोरास विहिरीतून बाहेर काढून रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर या मोरास निसर्गात मुक्त करण्यात आले.

जीव वाचविण्याच्या धडपडीत मोर पडला विहीरीत
author img

By

Published : Jun 7, 2019, 3:14 PM IST

अहमदनगर - शिर्डी जवळील राहाता १५ चारी शिवारात १०० फुट खोल विहिरीत पडलेल्या मोराला प्राणी मित्रांच्या प्रयत्नांतून जिवदान मिळाले आहे. कुत्रे मागे लागल्याने हा मोर जीव वाचवण्यासाठी धडपड करत असताना विहिरीत पडला आणि जखमी झाला. दरम्यान, जखमी मोरास विहिरीतून बाहेर काढून रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर या मोरास निसर्गात मुक्त करण्यात आले.

विहिरीत पडलेल्या मोराला जीवदान

राहाता तालुक्यातील १५ चारी शिवारात महेंद्र पिपाडा यांच्या शेत शिवारात अनेक मोर आहेत. गुरुवारी सायंकाळी मोराच्या मागे कुत्रे लागल्याने एक मोर जीव वाचवताना १०० फुट खोल विहिरीत जाऊन पडला. त्यामुळे तो जखमी झाला. विहिरीत मोर पडल्याचे प्रियंका पिपाडा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती आपल्या कुटुंबीयांना सांगितली.

परंतु, विहीर खोल असल्याने त्यांना मोराला वाचवणे शक्य झाले नाही. त्यातच अंधार पडल्याने शुक्रवारी सकाळी काही तरुणांच्या मदतीने मोरास बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सतिष सोनवणे, भागवत पवार, बबलू गाडेकर, विजय मोगले, मालक महेंद्र पिपाडा आणि प्रियंका पिपाडा या सर्वांनी मोराला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. विहिरीत उतरणे सहजासहजी शक्य नसल्याने विहिरीत दोरीच्या सहाय्याने खाली उतरुन काही तरुणांच्या मदतीने मोरास एका कँरेटमध्ये टाकून बाहेर काढण्यात आले.

मोर जखमी अवस्थेत असल्याने त्यास चालताही येत नव्हते. त्यामुळे मोराला उपचारासाठी राहाता येथील पशुवैद्यकीय रूग्णालयात नेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी कदम यांनी मोरावर उपचार केले. दरम्यान, वनविभागाला ही माहीती दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी यांच्या सल्ल्यानुसार मोराला माळरानात पुन्हा मुक्त करण्यात आले.

Intro:

SHIRDI_RAVINDRA MAHALE

ANCHOR_ शिर्डी जवळील राहाता १५ चारी शिवारात १०० फुट खोल विहिरीत पडलेल्या मोराला प्राणी मित्रांच्या प्रयत्नांतुन जिवदान मिळाल आहे. कुत्रे मागे लागल्याने हा मोर जिव वाचवण्यासाठी धडपड करत असताना विहिरीत जाऊन पडला आणि जख्मी झाला...जख्मी मोरास विहीरीतुन बाहेर काढण्यात आल आणि दवाखान्यात उपचार करून त्यास निसर्गात मुक्त करण्यात आलय....

VO_ राहाता तालुक्यातील १५ चारी शिवारात महेंद्र पिपाडा यांच्या शेत शिवारात अनेक मोर आहेत. काल सायंकाळी मोराच्या मागे कुत्रे लागल्याने मोर जिव वाचवताना १०० फुट खोल विहीरीत जाऊन पडला आणि जख्मी झाला. विहीरीत मोर पडल्याच प्रियंका पिपाडा हिच्या लक्षात आल्यानंतर मोराला वाचवण्यासाठी तिने घरच्यांना सांगितल परंतु विहीर खोल असल्याने शक्य झाल नाही त्यातच अंधार पडल्याने आज सकाळी काही तरुणांच्या मदतीने मोरास बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सतिष सोनवणे , भागवत पवार , बब्लु गाडेकर , विजय मोगले , मालक महेंद्र पिपाडा आणि प्रियंका पिपाडा यांनी सर्वांनी मोराला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. विहीरीत उतरणे सहजासहजी शक्य नसल्याने विहीरीत रस्सीच्या सहाय्याने खाली उतरुन काही तरुणांच्या मदतीने मोरास एका कँरेट मध्ये टाकुन बाहेर काढण्यात आल....

BITE _ महेंद्र पिपाडा , शेतकरी
BITE_ जे.वाय कदम , पशुवैद्यकीय अधिकारी

VO_मोर जख्मी अवस्थेत असल्याने त्यास चालताही येत नव्हत.त्यानंतर उपचारासाठी मोराला राहाता येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आल. पशुवैद्यकीय अधिकारी कदम यांनी मोरावर उपचार केले. वनविभागाला माहीती दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी यांच्या सल्ल्यानुसार मोराला माळरानात पुन्हा मुक्त करण्यात आले....

BITE_ विजय मोगले , प्राणी मित्रBody:MH_AHM_SHIRDI PEACOCK SURVIVE_7 JUNE_MH10010Conclusion:MH_AHM_SHIRDI PEACOCK SURVIVE_7 JUNE_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.