ETV Bharat / state

Azadi Ka Amrit Mahotsav : शिर्डी येथे अमृत महोत्सवअंतर्गत “हर घर तिरंगा” रॅलीचे आयोजन - स्वातंत्र्याची 75 वे वर्ष

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण ( 75 Years of Independenceहोत असल्याने पूर्ण देशभर अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात याकरिता अहमदनगर क्षेत्रीय कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने "आझादी का अमृत महोत्सव" ( Azadi Ka Amrit Mahotsav ) अंतर्गत २५ जुलै रोजी “हर घर तिरंगा” या उपक्रमा अंतर्गत “हर घर तिरंगा” रॅलीचे ( Har Ghar Tiranga Rally ) आयोजन करण्यात आले होते.

Azadi Ka Amrit Mahotsav
आझादी का अमृत महोत्सव
author img

By

Published : Jul 26, 2022, 2:04 PM IST

शिर्डी (अहमदनगर) : साईबाबा संस्थानचे ( Saibaba Sansthan ) श्री साईबाबा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिर्डी आणि भारत सरकार सूचना एवं प्रसारण मंत्रालय ( India Ministry of Information and Broadcasting ), केंद्रीय संचार ब्युरो ( Central Bureau of Communications ) अहमदनगर क्षेत्रीय येथील राष्ट्रीय यांचे संयुक्त विद्यमाने "आझादी का अमृत महोत्सव" ( Azadi Ka Amrit Mahotsav ) अंतर्गत “हर घर तिरंगा” रॅलीचे ( Har Ghar Tiranga Rally ) आयोजन करण्यात आले होते.

Amrit Mahotsav
अमृत महोत्सव

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम : स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक, घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने या देदीप्यमान इतिहासाचे संस्मरण करण्यासाठी २५ जुलै रोजी “हर घर तिरंगा” या उपक्रमा अंतर्गत ही रॅली काढण्यात आली होती.

Amrit Mahotsav
अमृत महोत्सव

विविध वेशभूषेत विद्यार्थी : यावेळी भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, भारत माता आणि मौलाना आझाद यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. या रॅलीचे उद्घाटन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते करण्यात आले.

भाग्यश्री बानायत यांचे मार्गदर्शन : या रॅलीचे सांगता प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ‘७५’ हा अंक तयार केला. त्यानंतर महाविद्यालयामध्ये आणून रॅली विसर्जित करण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीचे उद्घाटनप्रसंगी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक, कर्मचारी यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.

केंद्रीय संचार ब्युरोचे अधिकारी उपस्थित : यावेळी केंद्रीय संचार ब्युरो, अहमदनगर येथील माधव जायभाये, पी. शिवकुमार, प्राचार्य विकास शिवगजे, गंगाधर वरघुडे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही रॅली यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा. मुबीन शेख यांचेसह राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. रॅलीनंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

या महोत्सवात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न : अमृत महोत्सव अंतर्गत “ हर घर तिरंगा ” रॅली याबाबत माहिती सांगताना प्राचार्य विकास शिवगजे म्हणाले, शासनाचे आदेशानुसार महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आपल्या घराशेजारील चार नागरिकांना तिरंगा ध्वज देऊन सर्व नियमांचे पालन करून नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज फडकावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर महाविद्यालयाचे विद्यार्थीही शहरातील प्रत्येक घरात जाऊन याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत.

हेही वाचा : Uddhav Thackeray Interview: घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला- उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.