शिर्डी साईबाबांच्या मंदिरात हार फुल प्रसाद घेऊन जाऊ द्यावा या मागणीसाठी फुल विक्रेता आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून शिर्डीत आंदोलन सुरू आहे. गेल्या पाच दिवसापासून शिर्डीत सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांचे साईबाबांच्या द्वारकामाई समोर उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज शिर्डीत आले असून साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर फुल विक्रेता यांचे सुरू असलेल्या उपोषणाला भेट देणार आहेत. त्यानंतर साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळा बरोबर बैठक घेणार आहेत.
राज्य सरकारची काय नियमावली तपासणार शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली आहे. या बैठकीत साई मंदिरातील हार फुल प्रसाद बंदीबाबत कुठलाच निर्णय झालेला नाहीये. साई संस्थानच्या विश्वस्त बैठकीत कोणताही ठोस निर्णय नाही झालेला नाही. हार फुल प्रसाद बंदीचा निर्णय हा त्रीसदस्यीय समितीचा होता. शिर्डीतील विविध पक्षांच्या नेत्यांनी हार प्रसाद फुलांवरील बंदी कायम ठेवा अशी मागणी विश्वस्त मंडळाला केली असून भाविकांची फसवणुक आणि आर्थिक लूट होत असल्याने बंदी कायम ठेवण्याची देखील मागणी होतेय. फुल विक्रेते एजंट अव्वाचे सव्वा दर घेत असल्याच्या भाविकांच्या देखील तक्रारी साई संस्थानच्या विश्वस्त मंडळातील पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे बैठकीत हार फुल प्रसाद बंदीवर प्राथमिक चर्चा झाली. याबाबत राज्य सरकारची काय नियमावली प्राप्त होते त्या अन्वये पुढील निर्णय घेऊ अशी माहिती साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी प्रसार माध्यमांना दिलीये.