Minister Radhakrishna Vikhe Patil : 'त्या' उमेदवाराची जाहीर सभा थोरातांनी संगमनेरातच घेतली पाहीजे; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला - मंत्री राधाकृष्ण विखे
कॉंग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींवर विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, या घडामोडींबाबत निष्ठेचे धडे देणा-या बाळासाहेब थोरातांनीच आता ख-या अर्थाने खुलासा करण्याची गरज आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होतील तेव्हा त्या उमेदवाराची जाहीर सभा थोरातांनी संगमनेरातच घेतली पाहीजे, असा टोला त्यांनी दिला. बीड येथील एका कार्यक्रमास जाण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी विमानतळावर १० मिनिट थांबले होते. यादरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
अहमदनगर (शिर्डी) : राज्यात अनेक दिवसांपासून विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्जांवरून महाविकास आघाडीत धूसफूस पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींबाबत निष्ठा आणि इतर बाबतीत ज्ञान पाजळणा-या बाळासाहेब थोरातांनीच आता खुलासा करण्याची गरज असल्याचे मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर तिळगुळ देवून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले.
उपमुख्यमंत्र्यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत : बीड येथील एका कार्यक्रमास जाण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी विमानतळावर १० मिनिट थांबले होते. यादरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळगुळ देवून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपाचे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, राहाता तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शिर्डी शहर अध्यक्ष सचिन शिंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, आदी उपस्थित होते.
विखे पाटील व उपमुख्यमंत्र्यामध्ये चर्चा : एकीकडे पदवीधर निवडणूकीतील घडामोडी वाढत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये शिर्डी विमानतळावर झालेल्या चर्चेचा तपशिल उघड झालेला नाही. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी सत्यजीत तांबेच्या पाठींब्याबाबत सर्वोतोपरी निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार असून पक्षाकडून ज्या उमेदवाराला पाठींबा दिला जाईल, त्याला निवडणून आणण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
कॉंग्रेसवर केली टीका : कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व पक्षाच्या विचारांशी फारकत घेवून काम करीत आहे. भारत जोडो यात्रा कॉंग्रेससाठी नव्हे तर राहुल गांधीसाठीच असून, स्वत:ची छबी वाढविण्यासाठीच ही यात्रा आहे. या पक्षातून युवक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. भारत जोडो पेक्षा कॉंग्रेस छोडो हा कार्यक्रम वेगाने सुरु असल्यानेच कॉंग्रेसची अवस्था बिकड झाली असल्याची टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
बाळासाहेब थोरातांवर प्रश्नचिन्ह : विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी आमदार सुधीर तांबे यांनी बंडखोरी करत मुलगा सत्यजित तांबे यास नाशिक पदवीधर निवडणुकीत उभे केले. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे. यावर काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त करत आम्ही सत्यजित तांबे यांना मदत करणार नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, तांबेंच्या बंडखोरीवर अद्याप कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात मौन बाळगून आहेत. यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांनी जर गडबड होऊ शकते असे सांगितले होते तर त्यावर थोरात गप्प का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.