ETV Bharat / state

तिरुपती मंदिराच्या पदाधिकाऱ्यांची शिर्डीत बैठक; कोरोनाकाळातील दर्शन व्यवस्थेवर चर्चा

author img

By

Published : Sep 9, 2020, 4:30 PM IST

Updated : Sep 9, 2020, 4:58 PM IST

देशात अनलॉक सुरु झाल्यानंतर मंदिरे उघडली जात आहेत. मात्र, शिर्डीचे साईबाबा मंदिर अद्याप शासनाचे आदेश आले नसल्याने उघडले गेले नाही. दुसरीकडे भक्तांनी मंदिर उघडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता साईबाबा संस्थाननेही तयारी सुरू केली आहे. शासनाचे आदेश आल्यानंतर मंदिर सुरु करण्यावेळी काय काय करावे, याचा अभ्यास सध्या केला जात आहे.

tirupati temple members meet shirdi temple members
तिरुपती मंदिराच्या पदाधिकाऱ्यांची शिर्डीत बैठक

शिर्डी (अहमदनगर) - राज्य शासनाचे साई मंदिर उघडण्याबाबत आदेश आल्यानंतर काय उपयोग योजना कराव्यात, याबाबत साई संस्थाने तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांबरोबर शिर्डीत एक बैठक घेण्यात आली.

तिरुपती मंदिराच्या पदाधिकाऱ्यांची शिर्डीत बैठक; कोरोनाकाळातील दर्शन व्यवस्थेवर चर्चा

देशात अनलॉक सुरु झाल्यानंतर मंदिरे उघडली जात आहेत. मात्र, शिर्डीचे साईबाबा मंदिर अद्याप शासनाचे आदेश आले नसल्याने उघडले गेले नाही. दुसरीकडे भक्तांनी मंदिर उघडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता साईबाबा संस्थाननेही तयारी सुरू केली आहे. शासनाचे आदेश आल्यानंतर मंदिर सुरु करण्यावेळी काय काय करावे, याचा अभ्यास सध्या केला जात आहे. त्या अनुषंगानेच साई संस्थानने कोविड काळानंतर मंदिर सुरू करणाऱ्या तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांकडुन त्यांनी केलेल्या उपाय योजनांची माहिती घेण्यासाठी त्यांना शिर्डीला आमंत्रित केले गेले होते.

त्यानंतर तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बारेड्डी यांनी शिर्डीला भेट देत संस्थानच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत कोविडवर नियंत्रण ठेवत दर्शनव्यवस्था कशी सुरळीत ठेवायची, याबाबत चर्चा केली आहे. तिरुपती आणि शिर्डी येथील मंदिराच्या भौगोलिक परिस्थितीत बदल आहेत. त्यामुळे येथे काही नविन उपाय करावे लागतील. साई मंदीर सुरू करताना फिजिकल डिस्टन्सिंग, ओझोनद्वारे सॅनिटायझेशन कमीत कमी वेळात दर्शन कसे देता येईल, भक्तांना दर्शनाच ऑनलाईन बुकिंग उपलब्ध करुन देताना किती भक्त येतील, याचा अंदाजही घेता येणार आहे.

साई बाबांच्या दर्शनासाठी एका तासाला चारशे भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था संस्थानकडून असणार आहे. साई मंदिरात दररोज चार आरत्या होतात. त्यावेळी भक्त उपस्थित राहता त्यामुळे मास्क लावून भक्तांना किती वेळ उपस्थित ठेवता येईल, याचा अभ्यासही वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच्या मदतीने केला जाणार आहे, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बग़ाटे यांनी दिली.

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थानाचे अध्यक्ष, वाय. व्ही. सुब्बारेडी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह साई संस्थानला भेट दिली. कोविडवर नियंत्रण ठेवत दर्शनव्यवस्था कशी सुरळीत ठेवायची, याबाबतचा कानमंत्र त्यांनी साई संस्थानच्या वरिष्ठ अधिकान्यांना दिला. यावेळी त्यांनी खबरदारीची तपशीलवार माहिती दिली. तिरुपती देवस्थानाचे दैनंदिन उत्पन्न सध्या एक कोटींवर, तर भाविकांची संख्या बारा हजारांवर आहे. कोविड संसर्गावर तूर्त तरी नियंत्रण असल्याची माहिती वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी साई संस्थानचा अधिकारी यांना दिली.

भाविक तिरुपती दर्शनासाठी येऊन गेल्यानंतर पाच ते आठ दिवसांनी आम्ही रोज 200 भाविकांना फोन करतो. तुम्हास कोविड किंवा अन्य काही त्रास झाला का, असे विचारतो. देवाच्या कृपेने अद्याप तसे काही झाले नाही. फिजिकल डिस्टन्सिंग, ओझोनद्वारे सॅनिटायझेन व कमीत कमी वेळात दर्शन, तसेच निवास व्यवस्थेची वेगळ्या पद्धतीने काळजी आम्ही घेत असल्याची माहिती तिरुपती बालाजी देवस्थानाचे अध्यक्ष, वाय. व्ही. सुब्बारेडी यांनी साई संस्थानचा अधिकाऱ्यांना दिली.

साई संस्थानच्या अधिकाऱ्यांनी तिरुपती बालाजी देवस्थानाची व्यवस्थाही पाहण्यासाठी यावे, असे निमंत्रणही तिरुपती बालाजी देवस्थानाचे अध्यक्ष, वाय. व्ही. सुब्बारेडी यांनी साई संस्थानला दिले आहे.

Last Updated : Sep 9, 2020, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.