ETV Bharat / state

शिर्डीत 'नो मास्क, नो एन्ट्री' फलकावरून भाविकांमध्ये गोंधळ, फलक लावला अन् काही वेळात काढूनही टाकला - Mask Entry Board

Mask Entry Board : कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई संस्थान परिसरात आज (शुक्रवारी) 'नो मास्क, नो एन्ट्री' असा फलक लावलेला आढळला. (Sai Institute Shirdi) यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये गोंधळ उडाला. (Corona Outbreak Shirdi) परंतु, काही वेळानं हे फलक काढून टाकण्यात आले. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून हे फलक लावण्यात आले होते, अशी चर्चा सुरू झाली.

Mask Entry Board
फलक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 7:15 PM IST

शिर्डी (अहमदनगर) Mask Entry Board : कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने शिर्डी साईबाबा संस्थानने 'नो मास्क, नो दर्शन' असे धोरण अवलंबावे, अशी सूचना महसूलमंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानाला चार दिवसांपूर्वी केली होती. (Sai Darshan Shirdi) राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानाला केलेल्या सूचनेला साईबाबा संस्थान काय प्रतिसाद देते याची चर्चा होत असतानाच आज सकाळी साईबाबा संस्थानने मंदिर परिसराच्या बाहेरील बाजूस 'नो मास्क, नो एन्ट्री' (Shirdi No Mask No Entry Board) असे फलक अनेक ठिकाणी लावल्याचं दिसून आलयं. (Corona In Shirdi)

फलक तातडीने काढले : आता साईबाबांच्या मंदिरात विना मास्क जाता येणार नाही, असा SMS पसरत असतानाच काही तासाच्या आतच साई संस्थानकडून 'नो मास्क, नो एन्ट्री'चे लावलेले फलक तातडीने काढून टाकण्यात आले आहेत.

कोणाच्या आदेशावरून लावले फलक? साईबाबा संस्थानने 'नो मास्क, नो एन्ट्री'चे लावलेले हे फलक काढल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या बाबतचा निर्णय साई संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने घेतला होता का? घेतला नसेल तर बोर्डाची छपाई करून ते लावण्यात कसे आले. ते लावण्याचे आणि काढण्याचे आदेश नेमके कोणी दिले. यावर आता शिर्डी ग्रामस्थांसह भाविकांमध्ये चर्चेला उधाण आलय. साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सध्या मास्क लावण्या संदर्भात कुठलीही सक्ती नसल्याचं दिसून येतय.

मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा : देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन (Corona JN1) हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 21 डिसेंबर, 2023 रोजी आरोग्य यंत्रणा तसंच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडिट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे असं सांगून, राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलीय.

लक्षणे दिसल्यास तपासणी करावी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने याआधी देखील कोविडच्या संकटाचा यशस्वी मुकाबला केला आहे. संपूर्ण जगाने त्याबाबतीत आपल्या देशाचे अनुकरण केले. मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. आगामी सण आणि नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. आपल्यामुळं इतरांना संसर्ग होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांना सांगितलं.

चुकीच्या बातम्या प्रसारित करू नका : सोशल मीडियावरून तसंच प्रसारमाध्यमांनी देखील या नव्या व्हेरिएंट संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम किंवा घबराट निर्माण होणार नाही, अफवा पसरणार नाही. माहिती प्रसारित करताना अधिकृत माहितीचाच उपयोग करावा, यासाठी सहकार्य करावे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय.

हेही वाचा:

  1. INDIA आघाडी तुटण्याच्या मार्गावर? शिवसेना महाराष्ट्रात २३ जागांवर ठाम, ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये एकला चलोचा नारा
  2. लोकसभेसाठी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये धुसफुस
  3. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा राजीनामा, नितीश कुमार यांच्या हाती पुन्हा पक्षाची धुरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.