ETV Bharat / state

कुरणवाडी परिसरात जखमी अवस्थेत आढळला बिबट्या - Forest Department

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात कुरणवाडी परिसरात एक बिबट्या जखमी अवस्थेत आढळला. त्यामुळे परिसरात दहशत पसरली.

Leopard
author img

By

Published : Feb 11, 2019, 9:21 AM IST

अहमदनगर - राहुरी तालुक्यातील कुरणवाडी परिसरात एक बिबट्या जखमी अवस्थेत आढळला. त्यामुळे परिसरात दहशत पसरली. दरम्यान, वनविभागाने बिबट्याला पिंजरा लावून पकडले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

कुरणवाडी येथील शेतकरी घमाजी शिवराम खिलारी यांच्या शेतामध्ये पहाटेच्या वेळी कांद्याच्या शेतात शेतमजुरांना बिबट्या बसलेला दिसला. त्यामुळे जवळपासचे शेतकरी भयभीत झाले होते. ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बिबट्या जखमी असल्याचे दिसून आले.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्यासमोर पिंजरा ठेवला. त्यावेळी बिबट्याने पिंजऱ्यात उडी घेतली. जखमी बिबट्याला डिग्रस नर्सरीत पुढील उपचारासाठी ठेवण्यात आले असून जुन्नर येथील डॉक्टरांचे विशेष पथक उपचारासाठी येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

Intro:Shirdi_Ravindra Mahale

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कुरणवाडी परीसरात जखमी अवस्थेत बिबट्या आढळल्याने परिसरात घबराट पसरली होती.दरम्यान वनविभागाने बिबट्यालगत पिंजरा लावल्यानंतर रेंगाळत बिबट्याने पिंजर्‍यात उडी घेतल्यानंतर बिबट्यानेही आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्‍वास घेतलाय....

कुरणवाडी येथील शेतकरी घमाजी शिवराम खिलारी यांच्या शेतामध्ये पहाटेच्या वेळी कांद्यामध्ये बिबट्या बसलेला असल्याचे शेतमजुरांना दिसले. त्यामुळे आस पासचे शेतकरी भयभीत झाले होते ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली त्या नंतर वन विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट दिली असता तो जखमी असल्याच दिसुन आल त्या नंतर बिबट्याच्या समोर पिंजरा उभा केला असता बिबट्या ने पिंजर्यात उडी घेतली....जखमी बिबट्यास डिग्रस नर्सरीत पुढील उपचारासाठी ठेवण्यात आले असुन जुन्नर येथील डाॅक्टरांचे विषेश पथक उपचारासाठी येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आलय....Body:10 Feb Shirdi Rahuri Injured LeopardConclusion:10 Feb Shirdi Rahuri Injured Leopard
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.