ETV Bharat / state

इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य प्रकरणातील सरकारी वकिलांची माघार

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी मुलांच्या जन्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात 26 जून रोजी संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी होण्याआधी सरकारी वकिलांनी या खटल्यातून माघार घेतली आहे.

Indorikar Maharaj
इंदोरीकर महाराज
author img

By

Published : Nov 25, 2020, 12:29 PM IST

Updated : Nov 25, 2020, 1:19 PM IST

अहमदनगर - इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी सुनावणी होण्याआधीच सरकारी वकिलांनी माघार घेतली आहे. या प्रकरणाची संगमनेर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, सरकारी वकील कोल्हे यांनी हा खटला लढविण्यास असमर्थता दाखविली आहे, अशी माहिती अंनिसच्या अ‌ॅड रंजना गावंदे यांनी दिली माहिती.

वकिलांनी घेतली माघार -

कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यासंबंधी संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचे कामकाज आज होणार होते. मात्र या खटल्यात काम पहाणाऱ्या सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी आपले वकील पत्र मागे घेतले आहे. इंदुरोकरांचे वकील के. डी. धुमाळ हे सरकारी वकिलांच्या भावाची ही एक केस चालवत असल्याने त्यांनी या इंदोरीकरांच्या खटल्याचे वकील पत्र सोडल्याची माहीती समोर आली आहे. मात्र, सरकारी वकीलांनी वेळीच विचार करुन निर्णय घेणे गरजेचे होते. आता या खटल्यात नविन वकीलांची नेमणूक होऊन खटला जलद गतीने चालवण्यात यावा, अशी मागणी इंदोरीकर खटल्यातील तक्रारदार रंजना गवांदे यांनी केली आहे.

इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य प्रकरणातील सरकारी वकिलांची माघार

काय आहे प्रकरण -

कीर्तनातून ‘पीसीपीएनडी’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदुरीकरांविरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे. तेथे देण्यात आलेल्या प्रोसेस इश्यूच्या आदेशाला इंदुरीकरांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. संगमनेरच्या सत्र न्यायालयाने या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली असून त्यावर पुढील सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली होती . तर इंदुरीकरांचे वकील म्हणून . के. डी. धुमाळ हे काम बघत आहेत. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अॅड. रंजना गवांदे बाजू मांडत आहेत. सर्वांना लेखी युक्तिवाद सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. मागील तारखेला हे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे सुनावणी ठेवण्यात आली होती मात्र आज कामकाज होणार असतांनाच यातील सरकारी वकीलांच्या भावाविरूद्ध संगमनेरच्या न्यायालयातच एक खटला सुरू आहे. त्यामध्ये इंदुरीकरांचे वकील धुमाळ हेच बाजू मांडत आहेत. त्यावरून चर्चा आणि आरोप सुरू झाले. आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात असे संबंध असू नयेत. त्याचा कामकाजावर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली होती त्या मुळेच सरकारी वकील कोल्हे यांनी या खटल्यापासून स्वत:ला बाजूला करण्याचा निर्णय घेतला असल्याच बोलल जातय. आता या खटल्यात सरकारी वकील म्हणुन अरविंद राठोड हे काम पहाणार असुन येत्या 2 डिसंबरला या खटल्याच काम काज होणार असल्याची माहीती अ‌ॅड. रंजना गवांदे यांनी दिली आहे.

हेही वाचा - सिंधुदुर्गात नव्याने सापडले कातळशिल्प; अश्मयुगीन पाऊल खुणा

Last Updated : Nov 25, 2020, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.