ETV Bharat / state

साई मंदिर परिसरात सुरु झाले ध्यान मंदिर....

साईभक्‍तांकडून अनेक दिवसांपासुन ध्‍यानकेंद्र उभारणीची मागणी होत होती. भाविकांची मागणी साई संस्थानने लक्षात घेतली आहे. सुमारे 40 लाख रुपये खर्च करुन ध्यानमंदिर उभारले आहे.

शिर्डी साई मंदिर येथे उभारण्यात आलेले ध्यान मंदिर
author img

By

Published : Jul 27, 2019, 5:55 PM IST

अहमदनगर - शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यापुढे भाविकांना साई मंदिराजवळ बसुन ध्यान करता येणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना साई दर्शन घेऊन तसेच परतावे लागत होते. भाविकांची मागणी साई संस्थानने लक्षात घेतली. गेल्या दोन महिन्यांपूर्वी साई मंदिराजवळ ध्यान मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला होता. हे ध्यान मंदिर साई सत्‍यव्रत हॉलच्या पहिल्‍या मजल्‍यावर उभरण्यात आले आहे.

शिर्डी साई मंदिर येथे उभारण्यात आलेले ध्यान मंदिर
सुमारे 40 लाख रुपये खर्च करुन ध्यानमंदिर उभारले आहे. ध्‍यानमंदिराचे उदघाटन संस्‍थानचे अध्‍यक्ष सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले आहे. जगाच्‍या व देशाच्‍या कानाकोपऱ्यातून साईबाबांच्‍या समाधी दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्‍त शिर्डी येथे येतात. यामुळे शिर्डीचा मंदिर परिसर नेहमी गजबजलेला असतो. अशा गजबलेल्‍या ठिकाणी ज्‍या साईभक्‍तांना 10 ते 15 मिनिटे ध्‍यान करुन मानसिक शांतता, स्‍थैर्य व बाबांची अनुभूती मिळवण्याची इच्छा आहे, याकरता शांततामय अशी जागा नव्‍हती. साईभक्‍तांकडून अनेक दिवसांपासून ध्‍यानकेंद्र उभारणीची मागणी होत होती. त्यामुळे 2700 चौ.फुट बांधकाम क्षेत्रफळ असलेले ध्‍यानमंदिर उभारण्‍यात आले आहे. या ध्‍यानमं‍दिराचा शेकडो साईभक्‍त दररोज लाभ घेऊ शकतील. हे ध्‍यानकेंद्र साऊंड प्रुफ व वातानुकुलित आहे, असे सुरेश हावरे यांनी सांगितले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकानासाठी एक आनंदाची बातमी..या पुढे तासुन तास साई मंदिरा जवळ बसुन करता येणार आपल्याला साई नामचा जप....

VO_ शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला साई दर्शन घेऊन तसेच परतावा
लागत होते यामुळे साई संस्थान गेल्या दोन महिन्या पूर्वी साई मंदिरा जवळ धान्य मंदिर उभरण्याचा निर्णय घेतला होता आणि आज हे धान्य मंदिर परिसरातील साई सत्‍यव्रत हॉलचे पहिल्‍या मजल्‍यावर उभरण्यात आले असून
सुमारे 40 लाख रुपये खर्च करुन उभारण्‍यात आलेल्‍या ध्‍यानमंदिराचे उदघाटन संस्‍थानचे अध्‍यक्ष सुरेश हावरे यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले आहे....

VO_जगाच्‍या व देशाच्‍या कानाकोप-यातुन साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्‍त शिर्डी येथे येतात..यामुळे शिर्डी ही नेहमी गजबजलेली असते. अशा या गजबलेल्‍या ठिकाणी ज्‍या साईभक्‍तांना 10 ते 15 मिनिटे ध्‍यान करुन मानसिक शांतता, स्‍थर्ये व बाबांची अनुभूती मिळावी याकरीता शांततामय अशी जागा नव्‍हती. त्‍यामुळे साईभक्‍तांकडून अनेक दिवसांपासुन ध्‍यानकेंद्र उभारणीची मागणी होत होती..साईबाबा समाधी मंदिरपरिसरातील साई सत्‍यव्रत हॉलचे पहिल्‍या मजल्‍यावर सुमारे 40 लाख रुपये खर्च करुन 2700 चौ.फुट बांधकाम क्षेत्रफळ असलेले ध्‍यानमंदिर उभारण्‍यात आलेले आहे. या ध्‍यानमं‍दिराचा शेकडो साईभक्‍त दररोज लाभ घेवू शकतील. हे ध्‍यानकेंद्र साऊंड प्रुप व वातानुकुलित असे असेल जेणे करुन त्‍याठिकाणी शांतता निर्माण होवून भक्‍तांना ध्‍यान करता येईल असे सुरेश हावरे यांनी सांगितले.....Body:MH_AHM_Shirdi_Paddy Temple_27_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Paddy Temple_27_Visuals_Bite_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.