ETV Bharat / state

Illegal Drug Stock Seized : गर्भनिरोधक गोळ्यांसह अवैध औषधाचा मोठा साठा जप्त, दोघांना घेतले ताब्यात

राहुरी पोलिसांनी सुमारे दिड ते दोन कोटींच्यावर असणार्‍या किंमतीचा औषध साठा पकडला. यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्यांसह, कोडीम कफ सिरफ, अल्फा झिरम, व्हायग्रा गोळ्यांचा साठा आढळून आला ( Illegal Drug Stock Seized in Rahuri ahmednagar ) आहे.

Illegal Drug Stock Seized
अवैध औषधाचा मोठा साठा जप्त
author img

By

Published : Aug 4, 2022, 1:12 PM IST

अहमदनगर : राहुरी शहरातील बारागाव नांदूर रोडवर एका गोदामावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे दिड ते दोन कोटीच्यावर असणार्‍या किंमतीचा औषध साठा पकडला. यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्यांसह, कोडीम कफ सिरफ, अल्फा झिरम, व्हायग्रा गोळ्यांचा साठा आढळून आला ( Illegal Drug Stock Seized in Rahuri ahmednagar ) आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बेकायदेशीरपणे हा साठा करण्यात आला असून याच गोदामातून औषधांची छुपी विक्री सुरू होती. राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या नशेली औषधाच्या विक्री मध्ये कोणाचा सहभाग होता.तसेच औषध विक्रतेही पोलिसांच्या रडारवर आले आहे.

अवैध औषधाचा मोठा साठा जप्त

औषधे वापरली जात होती नशा भागविण्यासाठी - याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यासह राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. छापा टाकण्यापूर्वी ज्यांनी औषधाचा साठा केला आहे. त्यांचा सकाळपासून शोध घेवून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतू या आरोपींचे नावे पोलिसांनी सांगण्यास नकार दिला. अन्न व औषध प्रशासनाचे डी.एम.दरंंदले यांनी घटनास्थळी येऊन या औषधांची तपासणी सुरू केली. हि सर्व औषधे नशा भागविण्यासाठी वापरली जात असल्याचे अन्न औषध प्रशासनाचे दरंदले यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर या औषधाची मोजदाद करण्यात आली असुन दिड ते दोन कोटीच्या रुपयांचा मुद्देमाल असल्याचे पोलिस सुत्रांडून समजले.

ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त - गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात अंमली पदार्थांची तस्करी सुरू होती. याची खबर पोलीस पथकाला लागली. राहुरी येथील चार ते पाच जणांची पोलीस पथकाने धरपकड केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवून माहिती घेतली. त्यानंतर श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, राहुरी येथील पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, आमली पदार्थ निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले, पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, महिला पोलिस उप निरीक्षक ज्योती डोके, पो.काँ आजिनाथ पाखरे, प्रवीण आहिरे, दादासाहेब रोहकले, रवींद्र कांबळे, नदीम शेख, अशोक शिंदे, विकास साळवे, रोहित पालवे, चालक लक्ष्मण बोडखे, डीवायएसपी पथकातील पोलिस नाईक नितीन शिरसाठ, चालक सहाय्यक फौजदार राजेंद्र आरोळे,होमगार्ड शाम कोबरणे,मनोहर मुसमाडे आदि फौजफाट्याने राहुरी शहर हद्दीतील बारागांव नांदूर रोड परिसरात असलेल्या शिव चिदंबर मंगल कार्यालय शेजारी असलेल्या एका पत्र्याच्या गाळ्यात धाड टाकली. त्या ठिकाणी उत्तेजीत करणार्‍या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, नशा आणणाऱ्या गोळ्या तसेच ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. सुमारे दिड ते दोन कोटी रूपयांचा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

राहुरी तालुक्यात प्रथमच ड्रग्ज सारखा अंमली पदार्थाचा मोठा साठा सापडल्याने तालुक्यासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या औषधाची विक्री कोणामार्फत करण्यात येत होती. याचा तपास पोलिस करीत असुन औषध विक्रेतेही पोलिसांच्या रडारवर आले आहे. दरम्यान ज्ञानेश्वर दरंदले यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा - Maharashtra Cabinet Expansion : 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; वाचा भाजप-शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.