ETV Bharat / state

Golden Girl Rutuja Bhosale : 'सुवर्ण' कामगिरी करत ऋतुजा भोसलेचा आशियाई स्पर्धेत डंका, वडिलांनी केले कौतुक - गृहविभागासाठी

Golden Girl Rutuja Bhosale : मराठमोळ्या ऋतुजा भोसलेनं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत भारताचं नाव उंचावलंय. तिनं रोहन बोपण्णा सोबत टेनिस मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकलंय. तिचे वडील संपत भोसले हे अहमदनगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक आहेत. त्यांनी मुलीच्या यशावर प्रतिक्रिया दिली आहे.

Golden Girl Rutuja Bhosale
Golden Girl Rutuja Bhosale
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 9:42 AM IST

Updated : Oct 1, 2023, 10:03 AM IST

ऋतुजाचे वडील संपतराव भोसले

अहमदनगर Golden Girl Rutuja Bhosale : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय शिलेदारांची घोडदौड सुरूच आहे. रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीनं मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक पटकावले आहे. मराठमोळ्या ऋतुजाचे वडील संपत भोसले हे अहमदनगर ग्रामीण विभागाचे डीवायएसपी आहेत. मुलीच्या सुवर्ण यशाबद्दल बापाला जसा आनंद आणि अभिमान वाटायला हवा तसा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

जागतिक स्तरावर ऋतुजानं यश मिळविल्यानंतर तिचे वडील, पोलीस उपअधीक्षक संपत भोसलेंचा सर्वस्तरातून सत्कार केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ऋतुजा भोसलेंचे कौतुक करणारे पोस्ट एक्स या सोशल मीडियावर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, ऋतुजाचे वडील संपत भोसले हे डीवायएसपी आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या गृहविभागासाठी 2 सुवर्णपदके मिळविली आहेत!

आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची लेक ऋतुजा भोसलेनं सुवर्ण कामगिरी करत भारताचं नाव उंचावलंय. रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीनं टेनिस मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकलं. भारतीय जोडीनं अंतिम फेरीत तैपेई जोडीचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव करत सोनेरी कामगिरी केलीय. सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या भारतीय जोडीनं जोरदार पुनरागमन केलं. रोहन आणि ऋतुजा यांनी मिश्र दुहेरी स्पर्धेत पहिला सेट उल्लेखनीय पुनरागमन करत विजयावर शिक्कामोर्तब केलाय. खरं तर ऋतुजाचं हे आशियाई खेळातील पहिलं पदक आहे, तर रोहन बोपण्णा २ वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता ठरलाय. ऋतुजा भोसले ही मूळची महाराष्ट्रातील असून राज्याच्या लेकीचं सर्वच स्तरातून कौतुक होतय.

  • आतापर्यंत भारताची उत्कृष्ट कामगिरी : १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं हे नववं सुवर्णपदक आहे. या सुवर्णपदकासह, भारताच्या एकूण पदकांची संख्या 38 झालीय. ज्यात 10 सुवर्ण, 14 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. सातव्या दिवशी भारताचं हे पहिले सुवर्णपदक ठरलं होतं. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केलीय.

हेही वाचा :

  1. Asian Games Tennis : मराठमोळ्या ऋतुजा भोसलेनं रोहन बोपण्णासोबत टेनिसच्या मिश्र दुहेरीत जिंकलं सुवर्णपदक...
  2. Indian 10m air rifle team gold: भारताच्या रायफल संघानं देशाला मिळवून दिलं पहिल सुवर्णपदक, संघात ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटील समावेश
  3. Asian Games 2023: भारतीय महिला क्रिकेट संघाकडून श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव, एशियन गेम्समध्ये जिंकले सुवर्ण

Last Updated : Oct 1, 2023, 10:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.