ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये 'या' ठिकाणी भरतोय लुकलुकणाऱ्या काजव्यांचा नेत्रदीपक सोहळा

शिखरस्वामिनी कळसुबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत.

काजवे
author img

By

Published : Jun 15, 2019, 2:30 PM IST

Updated : Jun 15, 2019, 2:48 PM IST

अहमदनगर - अकोले तालुक्यातील भंडारदरा-घाटघर परिसरातील वृक्षराजीवर लक्ष-लक्ष काजव्यांची मायावी दुनिया अवतरते. मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा, या दरम्यान हा अद्भुत देखावा बघायला मिळतो. हा देखावा बघण्यासाठी मुंबई-पुणे आणि इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात.

भंडारदरा-घाटघर परिसरात काजवे पाहण्यासाठी होणारी गर्दी

शिखरस्वामिनी कळसुबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा 'बसेरा' असतो. यामुळे ही झाडे 'ख्रिसमस ट्री'सारखी दिसतात. झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर अगणित काजवे बसलेले असतात. तर कित्येक काजवे झाडांभोवती पिंगा घालतात.

काजवा म्हणजे एक प्रकाशणारा कीटक आहे. त्याला ६ पाय आणि पंखाच्या २ जोड्या असतात. त्यामुळे तो हवेत सहज उडू शकतो. या लहान झुरळाइतक्या आकाराच्या किटकाचे शरीर ३ भागात विभागलेले असते. मे महिन्यात त्यांचे जीवनचक्र सुरू होते. तर जून महिन्याच्या मध्यापर्यंत त्यांच्या संख्येत मोठी भर पडते. मोसमी पावसाच्या तोंडावर ही संख्या लक्षावधी होते. यावेळी या भागातील अनोख्या काजवा महोत्सवाला सुरूवात होते आणि मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर या काजव्यांच्या जीवनचक्राची अखेर होते.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_दरवर्षीच्या मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा घाटघर परिसरातील वृक्षराजीवर लक्ष लक्ष
काजव्यांची मायावी दुनिया अवतरते..लख लख करणाऱ्या काजव्यानचा अदभूत देखावा पाहण्यासाठी मुंबई पुणे अन्य जिल्हातून पर्यटक होत आहे दाखल....

VO_ लक्ष लक्ष काजवे..नभोमंडळातील तारकादळेच जणू धरतीच्या भेटीला आले आहे..आपल्या चहुबाजूला पसरलेल्या मिट्ट काळोखाच्या साम्राज्यात अग्निशिखा हे विशेषण सार्थपणाने मिरविणा-या काजव्यांचा लयबद्ध चमचमाट अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात सुरु आहे....शिखरस्वामिनी कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत,भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा 'बसेरा' असतो. ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणाची का होईना 'वस्ती' असते, ती झाडे 'ख्रिसमस ट्री'सारखी दिसतात झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर अगणित काजवे बसलेले असतात. तर त्यांचे कित्येक भाईबंद झाडांभोवती पिंगा घालताहेत. विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरु असतो, त्याला एक लय असते. एक ताल असतो. आणि सूरही आहे. पण त्यांची भाषा अवगत नसल्याने हे सारे आपल्याला ऐकू येत नसावे. जणू काही काजवे त्यांच्या सुरात प्रकाश फुलांची उधळण करीत जीवनगाणे गाताहेत. लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप आपल्या डोळ्यांना सुखाऊन जातेय...कुतूहलमिश्रीत आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गाचं अनुपम वैभव आपण पाहतच राहतो. आणि पाहता-पाहाता भान हरपून जाते.भोवतीच्या विराट पसा-यात स्वत:ला आपण हरवून बसतो....

VO_ग्रीष्म ऋतूला निरोप देताना वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांची ही लक्ष लक्ष प्रकाश फुले मुक्तहस्ते उधळीत असल्याचा विचार मनात चमकून जातो. नभांगणातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय... इथे रात्रच चांदणं झालीय... असा आभास काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्री उद्दीपित झाल्या आहेत. तासन-तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळेच नुसतेच काजवे पाहणे, हादेखील जीवशास्राच्या अभ्यासकांच्या तसेच निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो. हे पाहताना मग काळोखाची, हिंस्र स्वापदांची, सरपटणा-या प्राण्यांची मनाला एरवी वाटणारी भीती कुठल्या कुठे पळून गेलेली असते....

VO_काजवा म्हणजे एक प्रकाशणारा कीटक आहे. त्याला सहा पाय आणि पंखाच्या दोन जोड्या असतात. त्यामुळे तो हवेत सहज उडू शकतो. या लहान झुरळाइतक्या आकाराच्या किटकाचे शरीर तीन भागात विभागलेले असते. रात्रीच्या अंधारात हवेत उडणार-या बागडणा-या या अग्निसख्याला दोन मोठे डोळे असतात.मे महिन्यात त्यांचे जीवनचक्र सुरुहोते..सुरुवातीला त्यांची संख्या नगण्य असते. म्हणजे आता जून महिन्याच्या मध्यापर्यंत तर त्यांच्या संख्येत भूमिती पद्धतीने वाढ होत प्रचंड मोठी भर पडते..मोसमी पावसाच्या तोंडावर ही संख्या लक्षावधी होते. तेव्हा तर या भागातील या अनोख्या काजवा महोत्सवाचा तर ख-या अर्थाने क्लायमॅक्स होतो..आणि मोसमी पाऊस दाखल झालाय नंतर इटुकल्या-पिटुकल्या काजव्यांच्या जीवनचक्राचीही अखेर होते....भंडारदरा परिसरातील रमणीय निसर्गातील अनोख्या जलोत्सवापूर्वीचा मनाला मोहिनी घालणारा काजवा महोत्सव आवर्जून पाहावा, एकदा तरी अनुभवावा असाच....Body:MH_AHM_Shirdi Celebration On Kajwa_14 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Celebration On Kajwa_14 June_MH10010
Last Updated : Jun 15, 2019, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.