ETV Bharat / state

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग : दोषींवर कडक कारवाई होणार - मंत्री हसन मुश्रीफ - hasan mushrif on ahmednagar civil hospital fire

मला स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यात किती जणांचा मृत्यू झाला याबाबत माहिती नाही. मी तिथे गेल्यावर माहिती घेईन. त्यानंतर तेथील परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. आधीच्या घटनांपासून आपण सावध व्हायला हवे. चौकशी केल्यानंतर जे कोणी यात जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

minister hasan mushrif
मंत्री हसन मुश्रीफ
author img

By

Published : Nov 6, 2021, 2:52 PM IST

Updated : Nov 6, 2021, 4:38 PM IST

पुणे - अहमदनगर शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अति दक्षता विभागातील (आयसीयू) कोरोना कक्षाला आज (शनिवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. त्यामध्ये तब्बल 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. झालेले सर्वजण 62 ते 70 वयोगटातील आहेत. 11 जणांचा मृत्यू झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, आगीला जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीनं अहमदनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत. याप्रकरणी त्यांनी पुण्यात माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

माध्यमांशी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ

काय म्हणाले मंत्री हसन मुश्रीफ?

मला स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यात किती जणांचा मृत्यू झाला याबाबत माहिती नाही. मी तिथे गेल्यावर माहिती घेईन. त्यानंतर तेथील परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. आधीच्या घटनांपासून आपण सावध व्हायला हवे. चौकशी केल्यानंतर जे कोणी यात जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू वॉर्डला आग; 11जण दगावले!

दरम्यान, शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना तातडीने सरकारी मदत दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अहमदनगरच्या सिव्हील हॉस्पीटलमधील आयसीयू कक्षात 25 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आग लागली आहे. त्यामध्ये आयसीयु कक्षातील सर्वजण गंभीररित्या भाजले. जखमी झालेल्या तात्काळ इतर कक्षामध्ये हलवण्यात आले आहे. अग्निशमन दल, रूग्णालय प्रशासन आणि पोलिस प्रशासन मदत कार्यात व्यक्त होते. घटनास्थळी स्थानिक आमदार संग्राम जगताप हे तातडीनं दाखल झाले आहेत. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. जखमी झालेल्या काही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. आगीत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

Last Updated : Nov 6, 2021, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.