अहमदनगर - अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह करत महात्मा गांधी यांनी केवळ देशालाच नाहीतर जगाला संदेश दिलेला आहे. आणि हाच संदेश पुन्हा एकदा अधोरेखित होत कृषी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले (Farm laws to be repealed) हे या निमित्ताने सिद्ध झालेला आहे हे संबंधितांनी लक्षात घ्यावे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी व्यक्त केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत निळोबाराय यांच्या अभंग गाथा प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
हा शेतकरी,लोकशाही आणि सत्याग्रहाचा विजय-
यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, स्थानिक नेते अशोक सावंत आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी पंतप्रधान यांनी कृषी कायदे मागे घेतले यावर बोलताना सांगितले. हा शेतकरी, लोकशाही आणि अहिंसा आणि सत्याग्रहाचा विजय आहे. महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य अहिंसेचे आंदोलन करत मिळवून दिलेले आहे. कृषी कायद्यांविरोधात केलेले आंदोलनही अहिंसेच्या मार्गाने होते. त्यामुळे त्याला एक वेगळे, असे महत्त्व आहे.
हेही वाचा - Farm laws to be repealed : हा तर शेतकऱ्यांचा विजय; पक्षाला नव्हे आंदोलनाला यश मिळते - अण्णा हजारे
एसटीचा प्रश्न आंदोलनाने नव्हे तर चर्चेनेच सुटेल -
एसटी महामंडळाच्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत पवार यांनी सांगितले, चर्चेने मार्ग चर्चेने प्रश्न सुटू शकतात. मात्र, काही नेते यामध्ये भावना भडकवण्याचे काम करत आहेत. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. योग्य पद्धतीने हा प्रश्न सुटला जाणार असताना भावना भडकवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
केंद्र करत असलेल्या खाजगीकरणावर बोला -
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही एसटी आंदोलनाबद्दल बोलताना सांगितले, एकीकडे भारतीय जनता पक्षाचे काही नेते एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन जी भूमिका मांडत आहे ती भूमिका त्यांनी एअर इंडियाचे खासगीकरण होताना का मांडले नाही. रेल्वे, एलआयसी खासगीकरण याबाबत केंद्र घेत असलेल्या भूमिकेवर राज्यातील नेते बोलत नाहीत. तसेच त्या हजारो कर्मचार्यांच्या पाठीशी उभे राहत नाही. मात्र, केवळ राजकारण करायचे म्हणून एसटी संघटनेच्या आंदोलनात वेगळी भूमिका मांडत दुटप्पीपणाची भूमिका दाखवत आहे, असे थोरात म्हणाले.