ETV Bharat / state

हनी ट्रॅप करून व्यापाऱ्याकडे १५ लाखाची खंडणीची मागणी; एका महिलेसह ५ जणांना अटक - मोबाईल

श्रीवर्धन शहरातील एका व्यापाऱ्याला मुलीने हनी ट्रॅप करून तिच्या साथीदारामार्फत ब्लॅकमेल करून १५ लाखाची खंडणी मागण्याचा प्रकार २४ जून रोजी घडला. याबाबत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेसह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण खंडणीचे असले तरी यामध्ये सेक्स रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हनी ट्रॅप करून व्यापाऱ्याकडे १५ लाखाच्या खंडणीची मागणी
author img

By

Published : Jun 26, 2019, 2:59 AM IST

Updated : Jun 26, 2019, 4:02 AM IST

रायगड - श्रीवर्धन शहरातील एका व्यापाऱ्याला मुलीने हनी ट्रॅप करून तिच्या साथीदारामार्फत ब्लॅकमेल करून १५ लाखाची खंडणी मागण्याचा प्रकार २४ जून रोजी घडला. याबाबत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेसह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील दोन महिला फरार आहेत. हे प्रकरण खंडणीचे असले तरी यामध्ये सेक्स रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हनी ट्रॅप करून व्यापाऱ्याकडे १५ लाखाची खंडणीची मागणी

या खंडणी प्रकरणात भूषण पतंगे (२९), विशाल मोरे (३३), कुणाल बंदरी (२८), अलका ठाकूर (६५), सिद्धार्थ मोरे (२७), अक्षय दासगवकर सर्व राहणार अलिबाग तसेच जगदीश ठाकूर (४२, रा. बोर्ली मांडला) या ६ आरोपींना अटक केली आहे. तर यातील मुख्य आरोपी पूजा व अनोळखी महिला फरार आहे.

श्रीवर्धन शहरातील एका किराणा व्यापाराला २४ जून रोजी आरोपी पूजा हिने फोन केला. त्यावेळी तिने तिच्या वडिलांच्या आजारपणाकरीता पैशाची गरज असून फिर्यादीने पैसे दिल्यास माझ्यासोबत हवे तसे करू शकता असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी हे पूजाच्या बोलण्यावर भुलून माणगांव येथे गेले. त्यानंतर फिर्यादीने पूजाला माणगावमधील लॉजवर घेऊन गेले.

पूजा व फिर्यादी हे दोघे लॉजवरील रूमवर पोहोचल्यावर आरोपी विशाल मोरे हा मोबाईल व कॅमेरा घेऊन भूषण पतंगे व इतर साथीदारांसोबत लॉजच्या रूमवर येऊन धडकले. यावेळी विशाल मोरे याने मी पूजाचा भाऊ आहे तर भूषण याने पत्रकार आहे, असे फिर्यादीस सांगितले. तसेच फिर्यादीस मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जगदीश ठाकूर याच्या झायलो कारमध्ये फिर्यादीला टाकून अपहरण केले. त्यानंतर फिर्यादीची सुटका करण्यासाठी १५ लाखाच्या खंडणीची मागणी केली.

माणगाव येथे पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे त्या व्यापाऱ्यांसह खंडणी मागणारे सगळे श्रीवर्धन येथे आले. येथे आल्यानंतर सदर खंडणीखोर तडजोडीसाठी बसले. यावेळी तडजोडीला बसणाऱ्यांना समोरच्या व्यक्तींचा संशय आल्यामुळे त्यांना घेऊन ते श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर सर्वजण पोपटासारखे बोलायला लागले.

या प्रकरणात श्रीवर्धन पोलिसांनी खंडणीबाबत गुन्हा दाखल केला असून ६ आरोपींना अटक केली आहे. तर यातील मुख्य आरोपी व एक महिला फरार आहे. दरम्यान, या आरोपींनी आणखी काही व्यापाऱ्यांना लुटले गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलीस तपासमध्ये खरी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Intro:हनी ट्रॅप करून व्यापाऱ्यांकडून पंधरा लाखाची खंडणी प्रकरणी एका महिलेसह सहा जणांना अटक

व्यापाऱ्याला फसवण्याच्या नादात आरोपी श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात

सेक्स रॅकेट असल्याचा संशय

खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेसह एक महिला फरार
 
रायगड : श्रीवर्धन शहरातील एका व्यापाऱ्याला मुलीने आपल्या हनी ट्रॅप करून जाळ्यात ओढून तिच्या साथीदारामार्फत ब्लॅकमेल करून पंधरा लाखाची खंडणी मागण्याचा प्रकार 24 जून रोजी घडला आहे. याबाबत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेसह सहा जणांना अटक केली असून दोन महिला फरार आहेत. हे प्रकरण खंडणीचे असले तरी यामध्ये सेक्स रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या खंडणी प्रकरणात भूषण पतंगे (29), विशाल मोरे (33), कुणाल बंदरी (28), अलका ठाकूर (65), सिद्धार्थ मोरे (27), अक्षय दासगवकर सर्व राहणार अलिबाग, जगदीश ठाकूर (42) रा. बोर्ली मांडला, अक्षय ठाकूर (25) रा. माणगाव या सात आरोपींना अटक केली आहे. तर यातील मुख्य आरोपी पूजा व अनोळखी महिला फरार आहे.Body:श्रीवर्धन शहरातील एका किराणा व्यापाराला 24 जून रोजी आरोपी पूजा हिने फोन करून तिच्या वडीलाच्या आजारपणाकरीता पैशाची गरज असुन फिर्यादी यांनी पैसे दिल्यास माझ्यासोबत
हवे असेल तसे करू शकता असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी हे पूजाच्या बोलण्यावर भुलून माणगांव येथे गेले. त्यानंतर फिर्यादी यांनी पूजा हिला घेऊन माणगाव मधील पूजा लॉजवर घेऊन गेले. पूजा व फिर्यादी हे दोघे लॉजवरील रूमवर पोहचल्यावर आरोपी विशाल मोरे हा मोबाईल व कॅमेरा घेऊन आपला साथीदार भूषण पतंगे व इतर याच्या सोबत लॉजच्या रूमवर येऊन धडकले. विशाल मोरे याने मी पूजा हीचा भाऊ आहे तर भूषण याने मी पत्रकार आहे असे सांगून इतर आरोपीनी फिर्यादी यास मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जगदीश ठाकूर यांच्या झायलो कार मध्ये फिर्यादी याला टाकून अपहरण केले. त्यानंतर फिर्यादी याची सुटका करण्यासाठी 15 लाखाची खंडणीची मागणी केली.

माणगाव येथे पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे त्या व्यापाऱ्यांसह खंडणी मागणारे सगळे श्रीवर्धन येथे आले. श्रीवर्धन येथे आल्यानंतर सदर खंडणीखोर तडजोडीसाठी बसले. यावेळी तडजोडीला बसणाऱ्यांना समोरच्या व्यक्तींचा संशय आल्यामुळे त्यांना घेऊन ते श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर सर्वजण पोपटासारखे बोलायला लागले. Conclusion:याबाबत फिर्यादी यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. श्रीवर्धन पोलिसांनी खंडणी बाबत गुन्हा दाखल केला असून सात आरोपींना अटक केली आहे. तर यातील मुख्य आरोपी व एक महिला फरार आहे.

श्रीवर्धन मधील या व्यापाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढून लुटण्याचा प्रकार घडला असताना अजून काही व्यापाऱ्यांना लुटले गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलीस तपासमध्ये खरी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Last Updated : Jun 26, 2019, 4:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.