अहमदनगर शिर्डी - साईमंदीरात हारफुल प्रसाद नेण्यास बंदीचा निर्णय उच्च न्यायालयाने नेमलेल्या त्रीसदस्यीय कमीटीने घेतला होता. त्यानंतर कोरोना कालावधीत साईभक्तांना फुलहार प्रसाद नेण्यासही बंदी घातली गेली होती. कोरोनाचे संकट दुर झाल्यानंतर सर्व बंधने उठवण्यात आले आहेत. Saibaba Mandira Haar Phul controversy सर्वकाही सुरळीत सुरु झाले. मात्र, साईमंदीरात फुलहार प्रसाद नेण्याची बंदी पुढे तशीच सुरु राहील्याने मंदीरात पुजा साहीत्य भक्तांना नेवू द्यावेत अशी मागणी भक्त फुल विक्रेते आणि फुल उत्पादक शेतकर्यांकडून साई संस्थानकडे केली जात होती. मात्र, साई मंदीर सुरू होवून जवळपास एकवर्ष होतय. मात्र, कोणताच निर्णय घेतला जात नसल्याने कोपरगाव येथील सामाजीक कार्यकर्ते संजय काळे यांनी आंदोलन केल होते, त्याचबरोबरीने शिर्डीत सामाजीक कार्यकर्ते दिगंबर कोते यांनीही उपोषण सुरु केले आहे.
शिर्डीच्या साईमंदीरात फुलहार प्रसाद वाहने हा जसा श्रध्देचा भाग आहे. तसेच पंचक्रोशीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुलाच्या बागा फुलवल्या आहेत. याच बरोबरीने फुलहार प्रसाद भक्तांनी कोणत्या दुकानातून खरेदी करावेत यांच्या आर्थिक स्थितीवर बंदीमुळे मोठा झाल्याने त्यांच्याकडूनही मंदीरात फुलहार प्रसाद सुरु करण्याची मागणी होत होती. यात फुलहार प्रसाद सुरु करण्याची मागणीसाठी शुक्रवारी फुलहार प्रसाद घेऊन साईमंदिरात जाण्याचा प्रयत्न केला असता, सुरक्षा रक्षक आणि त्यांच्यात झटापट झाली होती. यामुळे हा प्रश्न आणखीनच चिघळ्याने शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी करत शिर्डीत येवून प्रथम प्रशासकीय अधिकारी. साई संस्थानचे विश्वस्त आणि कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत बैठक घेत त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर ग्रामस्थांबरोबर बैठक घेत त्याच्याही भुमिका जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले. जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील हे ही उपस्थित होते. बैठक सुरु असतांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय ग्रुहमंत्री अमित शहा यांचाही या प्रश्नावर फोनवर चर्चा झाली.
विखे पाटील यांची शेतकर्या विषयी सकारात्मक भुमिका आहे या बैठकीनंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समीती स्थापन करण्यात आली आहे. साईमंदीरात फुलहार सुरु करण्याबाबत दुमत नाही मित्र ते सुरु केल्यानंतर भक्तांना अव्वाच्या सव्वा दराने प्रासादहार प्रसादाचे ताट विक्री केली जाते. त्या बाबत सातत्याने तक्रारी येतात विक्री व्यवहातुन वादही होतात काही टोळ्यामध्येही वाद होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ही निर्माण होतो. यामुळे पुन्हा फुलहार प्रसाद सुरु करतांना काय काय करायला हवे आणि इतर बाबीचा अभ्यास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली. ससदीय कमेटी अभ्यास करुन आपला अहवाल एका महीण्यात सादर करेल त्यानंतर पुढे निर्णय काय तो घेतला जाणार आहे. या दरम्यान फुलहार प्रासाद मंदीरात नेवु देण्याचा विश्वस्त मंडळाने घेतलेला निर्णय कायम राहणार आहे.
राज्य सरकारची काय नियमावली तपासणार शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली आहे. या बैठकीत साई मंदिरातील हार फुल प्रसाद बंदीबाबत कुठलाच निर्णय झालेला नाहीये. साई संस्थानच्या विश्वस्त बैठकीत कोणताही ठोस निर्णय नाही झालेला नाही. हार फुल प्रसाद बंदीचा निर्णय हा त्रीसदस्यीय समितीचा होता. शिर्डीतील विविध पक्षांच्या नेत्यांनी हार प्रसाद फुलांवरील बंदी कायम ठेवा अशी मागणी विश्वस्त मंडळाला केली असून भाविकांची फसवणुक आणि आर्थिक लूट होत असल्याने बंदी कायम ठेवण्याची देखील मागणी होतेय. फुल विक्रेते एजंट अव्वाचे सव्वा दर घेत असल्याच्या भाविकांच्या देखील तक्रारी साई संस्थानच्या विश्वस्त मंडळातील पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे बैठकीत हार फुल प्रसाद बंदीवर प्राथमिक चर्चा झाली. याबाबत राज्य सरकारची काय नियमावली प्राप्त होते त्या अन्वये पुढील निर्णय घेऊ अशी माहिती साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी प्रसार माध्यमांना दिलीये.
हे असतील सदस्य जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा कृषी अधिकारी सहकारी संस्थांचे उपनिबंधक अशा प्रकारची समीती पहिल्यांदाच समीती स्थापन करण्यात आली आहे.
प्रसाद हार बाबत काय निघु शकतो मार्ग
- फुलहार, प्रसाद बाबत एक नियमावली केली जाणार तयार
- शिर्डी पंचक्रोशीत शेतकर्यांच्या सातबारा उतार्यावर फुल शेतीची नोंद आहे. अश्याच शेतकर्या कडुन फुले साई संस्थाने खरेदी करुन ती विकावीत
- शिर्डीत परीसरातील फुल उत्पादक शेतकर्यांनी सहकारी संस्था स्थापन करत त्या द्वारे ही विक्री व्यवस्था उभारली जावु शकते
- शासनाने मंदीरात फुलहार प्रसाद पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यास संस्थान अनुकुल राहणार
- शिर्डीतील गुन्हेगारी आटोक्यात आणन्यासाठी कडक पाऊले उचलली जाणार
हेही वाचा - Dussehra Melava Shivaji Park शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा, शिंदे गट की शिवसेनेचा