अहमदनगर (संगमनेर) - पुणे-नाशिक राष्ट्रीय महाामार्गावरील बोटा येथील बाह्यवळण पुलावरून कार कोसळल्याने अपघात झाला आहे. यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारासम अपघात घडला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार ही कार पुण्यातून आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होती. शनिवारी सायंकाळी बोटा येथील बाहय्यवळण पुलाजवळ कार आली तेव्हा थेट पुलावरून खाली कोसळली. यात कारचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णवाहिकेतून रूग्णालयात पाठवण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग व घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा - मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी परीक्षेचा निकाल जाहीर, चार हजार 798 विद्यार्थी उत्तीर्ण