अहमदनगर- लग्न सोहळ्यात हौस करण्यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबले जात आहेत. राहाता येथील साकुरी येथे पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यात नववधुची पाठवणी थेट हेलिकॉप्टर मधुन केली गेली. नववधुला सरप्राईज म्हणुन माहेरच्या मंडळींनी हे आयोजन केल होते. माहेर साकुरी असलेल्या अंजलीला साकुरी ते शिरूर तालुक्यातील धानोरे अशी हवाईसफर घडवत कुटूंबीयांनी सुखद धक्का दिला.
शिर्डी जवळील साकुरी येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात आज दंडवते आणि डफळे परिवाराचा लग्नसोहळा आयोजीत करण्यात आला होता. दुपारी ४ वाजेच्या दरम्यान अचानक हेलिकॉप्टर मंगल कार्यालयासमोरील मैदानानर उतरले आणि वऱ्हाडी मंडळी, नातेवाईक आणि मित्र परिवारात मोठे कुतूहल पाहायला मिळाले.
नववधुची पाठवणी या हेलिकॉप्टरने होणार असल्याचे सर्वांच्या लक्षात आले आणि सर्वांना नववधुला मिळालेल्या या अनोख्या भेटीचे कौतुक वाटले. दंडवते परिवार आणि डफळे परिवार सधन आणि प्रगतिशील शेतकरी आहेत. मुलगा मुलगी भेद नको असा संदेश देण्यासाठी हा छेटासा प्रयत्न असल्याचे दंडवते परिवाराने सांगितले.
या अनोख्या भेटीमुळ नववधु अंजली जाम खुश दिसुन आली. मी आमच्या परिवारातील पहिली मुलगी आहे आणि परिवाराने माझी इच्छा पुर्ण केल्याचे अंजलीने सांगितले. तर राहुल याने अंजलीच्या परिवाराचे आभार मानले.