ETV Bharat / state

... आणि विश्वासचा झाला 'विश्वासघात'; शिर्डीतील धक्कादायक प्रकार

मुलाला लग्नाचे अमिष दाखवत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आज शिर्डीत समोर आला आहे. मुलगा लग्नस्थळी पोहोचताच तेथे कोणीही उपस्थित नसल्याने हा प्रकार त्याच्या लक्षात आला.

shirdi latest news
... आणि विश्वासचा झाला विश्वासघात शिर्डीतील धक्कादायक प्रकार
author img

By

Published : Jun 4, 2021, 7:44 PM IST

अहमदनगर - थाटामाटात लग्न करून नवरी मुलगी पळून जाण्याचे प्रकार आपण आतापर्यंत ऐकले होते. मात्र, मुलाला लग्नाचे अमिष दाखवत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आज शिर्डीत समोर आला आहे. मुलगा लग्नस्थळी पोहोचताच तेथे कोणीही उपस्थित नसल्याने हा प्रकार त्याच्या लक्षात आला.

प्रतिक्रिया

नाशिक शहरात राहणाऱ्या विश्वास या युवकाने आपल्या मित्राच्या बायकोच्या मदतीने शिर्डी जवळील निमगाव येथे राहत असलेल्या लुभाना नावाची मुलगी लग्नासाठी पसंत केली. त्यानंतर मध्यस्थी करणाऱ्याला दहा हजाराची रक्कमही अदा केली होती. लग्न ठरल्यानंतर नवरीमुलीसाठी विश्वासाने कपडेही खरेदी केले. तसेच लग्नाची तारीख 4 जून रोजी ठरली. त्यानुसार नवदेवाने काल आपल्या घरी हळदीचा कार्यक्रम उरकत तो मोजक्या मंडळीसह आज शिर्डीत लग्नाच्या ठिकाणी आला. मात्र, या ठिकाणी मांडव, वर्दळ, नवरी आणि मध्यस्थी यापैकी कोणीही आढळून आले नाही. त्यामुळे आपला विश्वासघात झाला असल्याचे त्याच्या लक्षात आले. दरम्यान, या प्रकरानंतर विश्वास शिर्डी पोलीस ठाण्यात मुलगी आणि मध्यस्थी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असता त्याला शिर्डी पोलिसांनी नाशिकमध्ये तक्रार करण्यास सांगितले.

हेही वाचा - राज्य सरकारने 'आदर्श शिक्षक' पुरस्काराची घोषणा करावी; महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.