ETV Bharat / state

Ahmednagar Borewell: आठ तासाचे प्रयत्न ठरले निष्पळ, बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचा मृत्यू

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी 8 तास प्रयत्न सुरू होते. परंतु मुलाला बाहेर काढले. पण त्याचे प्राण वाचू शकले नाहीत.

Ahmednagar Borewell
बोअरवेल मध्ये पडलेल्या मुलाला काढले बाहेर
author img

By

Published : Mar 14, 2023, 10:19 AM IST

अहमदनगर: जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शेतातील बोरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षाचा मुलगा पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजता घडली होती. तर सागर बुधा बरेला असे या चिमुकल्याचे नाव आहे. या मुलाला वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू होते. तर एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू होते. या परिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेवून होते. तर रात्री अडीच वाजेपर्यंत मुलाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते.

मुलाचे प्राण वाचू शकले नाही: संदीप हा पाच वर्षांचा मुलगा. संदीपचे कुटुंब मध्य प्रदेशातील रविहासी आहेत. बोरवेलच्या 15 फूट खोलीवरती हा मुलगा असल्याचे जाणले होते. त्याला वाचवण्यासाठी समांतर दोन जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू राहिले. तर घटनास्थळी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम तसेच, कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन दल, यांच्यासह महसूल प्रशासन तळ ठोकून राहिले होते. बोअरवेल मध्ये मुलगा पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. कर्जतमधील आणि पंचक्रोशीतील लोक मोठ्या प्रमाणात कोपर्डी येथे जमा झाले. पोलीस प्रशासनाने देखील सज्ज राहिले. जेसीबीच्या साह्याने बोरवेलजवळ खोदून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आले. परंतु अखेर त्याला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. परंतु मुलाचे प्राण वाचू शकले नाही.

बोअरवेलवर झाकण लावा: बोअरवेल मध्ये लहान मुल पडण्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. काहींचे प्राण वाचले तर काही मुलांना प्राण गमवावे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात असे जुने बोअरवेल उघडे असतील तर त्यांनी काळजी पूर्वक झाकण लावून बोअरवेल बंद केली तर, आहे घटना घडणार नाही. तसेच या या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.या आधीही अशीच एक घटना हापूर पोलीस स्टेशन ग्रामीण हद्दीतील मोहल्ला फुलगढी येथे घडली होती. सहा वर्षीय मुलगी खेळत असताना बोअरवेलमध्ये पडल्याची धक्कदायक घटना घडली होती. ४० फूट खोल बोअरवेलमध्ये मुलगा पडल्याने खळबळ उडाली होती. तर बोअरवेलमधून मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. एनडीआरएफच्या पथकाने मुलाला सुखरूपपणे बाहेर काढले होते.

हेही वाचा: Boy Rescued From Borewell बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला काढले सुखरूपपणे बाहेर एनडीआरएफने वाचवले प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.